तुम्हांला माझे विषय पोरकट वाटले, पेंटिंग स्टुडिओ काढण्याची माझी कल्पना तुम्हांला हास्यास्पद वाटली. कारण माझ्यापाशीं अनुभव नव्हता. चित्रकलेचं माझं ज्ञान अपुरं होतं. गिऱ्हाइकं मिळवण्याचा चतुरपणा माझ्यांत नव्हता. पण माझा आत्मविश्वास दांडगा होता. मला खात्री. होती कीं मी ह्या क्षेत्रांत चमकेन – यशस्वी होईन. त्यासाठी नोकरी सोडणं मला आवश्यक होतं. एक दोन वर्ष बेकारींत काढावी लागली असती तर मला त्याची पर्वा नव्हती. आईवडलांना मीं निश्चित भुक मरूं दिलं नसतं. तेवढं निश्चित मीं सांठवलं होतं, हेही तुम्हाला ठाऊक होतं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .