त्याची पुढे जाऊन चेंडू मारण्याची पद्धत, मध्येच मागे येऊन सरळ बॅटीन चेंडू तटवण्याची रीत, आडवा पाय टाकून 'कव्हर ड्राईव्ह’ आणि 'स्क्वेअर कट्' मारण्याची त्याची तऱ्हा जितकी डौलदार होती, तितकीच ती आकर्षक होती. त्याचा हा शैलीदार खेळ पाहून उपस्थित प्रेक्षकांच्या डोळयांचे पारणं फिटत होतं. त्याची तीक्ष्ण नजर, धिटाई, आणि आत्मविश्वास सारंच वाखाणण्याजोगं होतं. त्यानें दोनशे, अडीचशे, पावणेतीनशे अशा धावांचे आंकडे एखादी ट्रेन ज्या वेगानं मैलांचे दगड मागे टाकीत पुढे निघून जाते, त्याच वेगानं व अगदी सहजरीत्याच मागं टाकलेले होते. तो २९० च्या घरांत आला होता. आतां '२९५' हा त्याचा वैयक्तिक धावांचा आंकडा फळ्यावर झळकत होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .