मुंबई केंद्रावर पु.ल. असतानाच “तुझे आहे तुजपाशी” हे नाटक त्यांनी लिहिले. मालेगावी आलेल्या अपयशातही जे काही त्यांनी मनाच्या सांदीकोपऱ्यात साठवून आणले होते, त्याच्या पार्श्वभूमीवर ‘आचार्य’ अवतरले. मग गीता ली, काकाजी ओघाने आले. या संबंधात पु.ल. म्हणाले—
“—मला नाटक लिहून संपल्यावर सुनीताने विचारले, की पुढे तिसऱ्या अंकात ‘गीता’ या शब्दावपर कोटी करता यावी, म्हणून तू ‘गीता’ हे नाव नक्की केलेस का? याचे उत्तर खरोखरच ‘नाही’ असेच आहे. एखादा क्रांतिकारक आपल्या मुलीचे नाव असेच काहीतरी साधं-सुधं ठेवील. फॅशनेबल ठेवणार नाही—परंपरा म्हणून काही असतेच ना? मी ती मानतो. याकरता मला कुणी सनातनी म्हटलं, तरी राग नाही. बाईने लिपस्टिक लावली—अगदी ती मॉडर्न झाली—तरी घरी आलेल्या सुवासिनीला ती परत निघाल्यावर कुंकू लावण्याचा जो संस्कार आहे, तो मला टिकवावासा वाटतो—”
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .