तळं म्हणजे मोठी बारव होती. चौकोनी. चार बाजूंनी पायऱ्या. वरच्य बाजूला मोडकी खोली. त्यांत चौकोनी गुळगुळीत चार-एक दगड होते. बेगमा इथं स्नान करीत असाव्यात. त्या वेळेला कुणालाहि इथं येतां येत नसेल. जर चुकून परक्या पुरुषानं एक नजर टाकली तर त्याचा शिरच्छेदच होत असेल. किल्लेदाराला दहा-पंधरा बायका असतील. शिवाय दासी. बायकांतल्या कांहीं पळवून आणलेल्या. कांहीं खुषीनं आलेल्या असतील. कांहीं लढाईत पकडलेल्या. सुवासिक तेलं नि अत्तरं नि उटणी लावून त्या नग्न होऊन स्नान करीत असतील. इथं चहूंकडे फुलझाडे लावलेली असतील. सगळं रंगीबेरंगी दिसत असेल.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .