तेवढ्यांत निथळती गाडी स्टेशनांत आली आणि सेकंड क्लासच्या सीलबंद डब्यांत त्यानें प्रवेश केला. खिडक्यांचीं तावदानें खाली ओढलेली होतीं. आणि त्यांच्यावर थेंबांचीं मोहोळें बसलीं होतीं. एका मुलानें तीं मोहोळे पुसून टाकण्याकरितां आंतल्या बाजूनें कांचेवरून हात फिरवला आणि फसला बिचारा. पुन्हां पुन्हां त्यानें तसें केलें आणि त्याच्याकडे पाहून एक मारवाडी आपल्या चिंचुद्रीच्या आवाजांत हंसूं लागला. तें हंसणें ऐकून चन्द्रकान्ताच्या अंगावर शहारे आले. आणि तेवढ्यांत त्याला वाटले की, हें हास्य आपल्या परिचयाचे आहे. आपण अगदी जवळून पुन्हां पुन्हां तें ऐकलेले अहि कुठें बरें ? कधीं बरें ?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Varsha Halabe
2 वर्षांपूर्वी