दीनानाथांचा आवाज मधुर होता, तसाच तो तेजस्वी व चढाहि होता. गळ्याला फिरत स्वाभाविक होती. स्वर सुरेल लागत, स्वभावानें तडफदार व स्वतंत्र वृत्तीचे असल्याने त्यांच्या गाण्यांत पुष्कळच 'स्वतःचें' असें होतें, ते कोणा प्रसिद्ध किंवा लोकप्रिय गायकांची नक्कल करण्याच्या मागे पडले नाहींत. इतकेंच नव्हे, पण गुरु केलेल्या वझेबुवांची गायकीसुद्धां त्यांच्या गाण्याला स्पर्श करूं शकली नाहीं. हें जरी खरे असले, तरी त्यांच्या गाण्यावर कथ्थकी गाण्याची छाप दिसून येई. आणि ही गोष्ट अपरिहार्य होती. 'उग्रमंगल' नाटक बसवतांना, त्यांनीं कथ्यकाची नृत्यांत व संगीतांत तालिम घेतली होती. कथ्थकी गायन आणि पंजाबी टप्याचे गायन यांचें एकमेकांशीं सादृश्य फार आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .