हेमिंग्वेच्या या तिसऱ्या व्यक्तित्वाची बांधणी आध्यात्मिक अनुभूतीला केंद्रस्थानीं कल्पिणारी आहे. या अवस्थेमध्येंहि त्याची शैली आपली सेंद्रियता कधींच सोडीत नाहीं. पण सेंद्रिय संवेदनांच्या द्वारे जीवनांतील प्राथमिक वासनांचा आलेख निर्माण करणे ही त्यांतील आद्य प्रेरणा असावी असे वाटत नाहीं. रक्तामांसाच्या आणि वासनाविकारांच्या या बुरख्याखाली मानवी व्यक्तित्वांतील एका अत्यंत उन्नत अवस्थेचा प्रत्यय येतो. आणि म्हणूनच ही नवी वस्तुनिष्ठा अगदीं निराळ्या अर्थानें अंतिम वास्तवाचा शोध घेत असते. 'The Old Man And The Sea' मध्ये नुसता एका म्हाताऱ्यानें एका माशासाठी केलेल्या साहसाचा सेंद्रिय आलेख आहे असें नव्हे. ती सर्व अनुभूति मानवी जीवनांतील एका चिरंतर सत्याने भारलेली आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .