माझा जन्म जरी महाराष्ट्रांत झाला असला तरी माझें सर्व बालपण उत्तरप्रदेशांत गेलं. अॅनी बेझंट यांच्या छत्राखाली माझं शालेय शिक्षण झालं. माध्यमिक शिक्षण कानपूरांत नि महाविद्यालयीन शिक्षण बनारस विद्यापीठांत झाल्यानं त्या वेळी तिकडे विशेष लोकप्रिय असलेले हॉकी व फुटबॉल हे खेळच मला सर्व प्रथम खेळायला मिळाले. या दोन्ही खेळांत मी अल्पकाळांत एवढी प्रगति केली होती कीं, आमच्या शाळांच्या सामन्यांत आमच्या शाळेचा मी एक आधाराचा खेळाडू होऊन बसलों होतों. हॉकीमध्यें लेफ्ट हाफ तर फुटबॉलमध्यें बॅक या माझ्या जागा ठरलेल्या. त्या वेळीं माझा खेळ इतका उत्तम व्हायचा की, आज ज्या ज्या वेळीं ते चुरशीचे सामने नि त्यांतील आमचा विजय आठवतो त्या त्या वेळीं माझं मलाच आश्चर्यं वाटतं कीं, एवढं क्रीडाचापल्य माझ्यांत कुठून आलं होतं ?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Pramod Namjoshi
11 महिन्यांपूर्वीलेख आवडला. छान आहे. अनुभव हाच गूरू.