वर्षाच्या अवधींत इंद्रवदन जें जें शिकवतील तें तें ती सहजपणे आत्मसात् करीत होती. त्यांनी शिकवलेले नृत्य ती स्वतःचा आत्मा त्यांत ओतून नाचू लागली म्हणजे त्याला कांहीं आगळाच रंग चढे, विरक्त भावांचे नृत्यहि आसक्तीचं वातावरण निर्माण करूं पाहे. नृत्याच्या उग्र छटांचा विलासहि मादक वाटू लागे. इंद्रवदनाच्या तें लक्षांत येई. परंतु ती जाणीव ते आंतल्या आंत कोंडून टाकीत. गंधमदेची ती निष्ठा, तो निर्धार, तें अध्ययन, ती तपस्या पाहून त्यांचा तिच्यावरचा राग हळु हळु विरघळत गेला होता. सुरुवातीला तिच्याशी ते जितक्य कडवटपणें वागता येईल तितक्या कडवटपणे वागत, कधीं कांहीहि न शिकविता तिला पिंजऱ्यांतल्या पोपटासारखे कोंडून ठेवीत, तिची नृत्यांत आगळीक होतांच तिला वाटेल तसे टाकून बोलत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Purnanand Rajadhyakshya
9 महिन्यांपूर्वीसुंदर भाषावैभव असलेली छान कथा वाचायला मिळाली.