तथापि ' चित्ते वाचि क्रियायां च महतामेकरूपता ‘ या न्यायाचें मोठेपणाचें आचरण त्याच्याठायी दिसून येत नसे. अनियंत्रित राजसत्तेबद्दल विरुद्ध उद्गार तो सामान्य व सार्वदेशिक असेच काढी. फ्रान्सच्या तत्कालीन राजकीय स्थितीबद्दल मात्र तो ब्रदेखील काढीत नसे; याचें कारण कदाचित् लहानपणापासून सोसावे लागलेले हाल, तुरुंगवास व परदेशगमनाची शिक्षा हें असावें असें धरलें, तरी तो १५ व्या लुईची व राजप्रतिनिधीची हांजी हांजी करीत असे या वर्तनाचें मात्र कारण सांगतां येत नाहीं. १४ वा लुई हा राजा तर फारच जुलमी होऊन गेला, परंतु त्याच्यावर देखील त्यानें पुष्कळ स्तुतिपर कविता लिहिल्या आहेत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .