जिच्या सोबतींत आयुष्याचा मध्यभाग आक्रमण केला, तिच्या वियोगानें व्हॉल्टेअर बराच उदास झाला व आपला वृद्धापकाळ जवळ आला असें समजूं लागला, तरी तिची आठवण बुजवून टाकणें त्याच्यासारख्या चंचलवृत्ति उथळ मनाच्या पुरुषास फारसें जड नव्हतें. “इतर बौद्धिक विषयांत मन एकाग्रपणें लावण्यासारखें मानसिक दुःखावर रामबाण औषध नाहीं, “असें त्यानें एका ठिकाणीं लिहिलें आहे. त्याप्रमाणें तो 'ओरेस्टीस ' आणि ' रोमचें संरक्षण हीं दोन नाटके लिहूं लागला व एका नाटकमंडळीस तालीम देण्याकरितां व ती देतांना आपल्या नेहमींच्या रिवाजाप्रमाणें स्वतः नाटकांत काम करण्यास जाऊं लागला. याच वेळीं फ्रान्सचा सुप्रसिद्ध नट ल केन याची व्हॉल्टेअरशीं गांठ पडली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .