चित्रपटांतील दुय्यम विनोदी भूमिकांच्यासाठी जॉनी वॉकर हा एक चांगला नट आहे. पण अलीकडे त्याला नायक बनवण्याचे स्तोम कांही चित्रपट निर्मात्यांत पसरले आहे. त्यामुळे जॉनीचा कंटाळा येऊ लागला आहे. पूर्वी नूरमहंमद चार्ली नांवाचा एक विनोदी नट चित्रपटांत नायकाच्या भूमिका करीत असे. तो पाकिस्तानला गेल्यानंतर त्याची जागा रिकामी झाली होती. पण जॉनी पडद्यावर येताच निर्माते-दिग्दर्शक एम्. सादिक यानी त्याला हाती धरून 'चार्ली टाईप' विनोदी चित्रपट निर्माण करण्याचा धडाकाच लावला. छू मंतर, दुनिया रंग रंगिली, खोटा पैसा, मायबाप वगैरे चित्रपट जॉनीला नायक बनवून त्यांनी निर्माण केले. या पैकी 'मायबाप' हा चित्रपट म्हणजे चार्लीच्या गाजलेल्या एका जुन्या चित्रपटाचा नवा अवतारच होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .