सुंदर हा हिंदी चित्रपटांतील लोकप्रिय विनोदी नटहि पंजाबीच आहे पण मजनूच्या मानानें हिंदी चित्रपटांत त्याला चांगली लोकप्रियता मिळाली आहे. पूर्वी तो चित्रपटांत स्वतः गात असे. 'झमेला' या चित्रपटांत सी. रामचंद्र यांचेबरोबर त्यानें 'तूं ठेर अभी मैं आया SS' हें गीता गायिलें होतें. 'शगुफा' या चित्रपटांत 'मैने लाखों के बोल सहे, सितमगर तेरे लिये ऽऽ' या लोकप्रिय गाण्याचे 'मैंनें लाटन पापड बेले सितमगर तेरे लिये ऽऽ' असें विडंबन करण्यांत आले होते. तेंहि सुंदरनें झक्क गायिले होते. अलीकडे मात्र त्याने गाण्याचे सोडून दिले आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .