सारखा खडतर प्रयत्न करून सुद्धां जी गोष्ट प्राप्त होण्यास अनेक जन्म घ्यावे लागतात, ती गोष्ट सवडीनुसार थोडासा प्रयत्न करून साध्य कशी व्हावयाची ? रात्रंदिवस शत्रूंशी युद्धकरून त्यांस जेर करून सोडण्याचा प्रयत्न करणार्या धैर्यधरास नांवें ठेवून, दुपारची वामकुक्षी वगैरे झाल्यावर मजेनें सायंकाळी जराशी लढाई केली ह्मणजे झाले, जेवणखाण सोडून वेळकाळ न बघतां एकसारखी लढाई कसली करावयाची असे विचारणारा मानापमानांतला लक्ष्मीधर, स्वतःच्या कल्पनेप्रमाणे युद्ध करून शत्रूंवर विजय मिळविण्यास जितका समर्थ होईल, तितकाच, सर्व दिवस अथवा दिवसांतील बहुतेक वेळ सांसारिक व प्रवृत्तिमय कर्मात घालवून थोडासा वेळ भगवत्प्राप्तीविषयों प्रयत्न करणारा साधक भगवत्प्राप्तीकरून घेण्यास लायक होईल असे ह्मटल्यास तें वावगे होईल काय ?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .