माझे वडील हीच मला आमची श्रीमंती वाटे. त्यांचे तें आमच्याकडे आपुलकीने पाहणें-आमची काळजी करणें-आमच्या सुखाकरिता कष्ट करणें- मला त्या वेळीं वाटे-असें 'वडील' असावेत- मग श्रीमंती नसली तरी चालेल! माझ्या वडिलांजवळ स्वभावाची 'श्रीमंती' होती! आणि त्या वेळेपर्यंत मला जीवनांत जो अनुभव आला तो सर्व चांगलाच होता, आपुलकीचा होता, सचोटीचा होता. रानांत वाघ, सिंह, कोल्हे, लांडगे असतात हें आम्हीं ऐकत होतों, वाचीत होतों, तसे माणसांतहि असतात हें आम्हीं ऐकलें होतें, पण पाहिले नव्हते- तसा मला व्यक्तिगत आयुष्यांत कांही अनुभव आला नव्हता. माणसांचें 'रान' आमच्या त्या वेळच्या आयुष्यापासून दूर दूर होतें !
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .