त्याकाळी वरील गोऱ्या अधिकारी वर्गाशीं अशा धर्तीचें वळण असणें खरोखरीच मोठे मानाचें, लौकिकाचें व लाभाचें साधन होतें. बोरीमास्तरांना तें साहजिक उपलब्ध झालें. त्यावेळी यवतमाळ जिल्ह्याची वसाहत होऊं घातलेंमुळे सरकारी कामानिमित्त अनेक गोऱ्या लोकांना तेथें वरचेवर यावें लागे. आशा स्थितींत त्यांच्या खाण्यापिण्यांत बोरीमास्तरांच्या उपरोक्त भाजीपाल्यानें कांहीं उणें पडू दिलें नाहीं. ज्याप्रांतांत नित्यास लागणारें खाद्य जिन्नस मिळण्याची पंचाईत तेथें जर शहरा सारखा उत्कृष्ट भाजीपाला मिळू लागला तर त्याचें कौतुक कोणास वाटणार नाहीं आणि ज्याचेकडून तो येतो, ती व्यक्ति कशी बरें लक्ष्यांत राहणार नाहीं ?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .