आणि आमच्या हिंदुस्थानांतील नोकरशाही, वसाहतवाल्यांच्या बांधवांचीच असल्यामुळे वसाहतींतील हिंदी मजुरांच्या शोचनीय स्थितीकडे हिंदुस्थान सरकारचें जावें तितकें लक्ष गेलें नाहीं. ही शोचनीय स्थिति हिंदुस्तानांतील पुढारी लोकांच्या लक्षांत येऊन गेल्यास पुष्कळ वर्षे झाली, पण गांधी सारखे पुरुष पुढे येईपर्यंत तिचें अल्प देखील निवारण झालें नाहीं. समजलें होतें पण उमजलें नव्हतें. आणि उमजलें तरी करवत नव्हतें असा प्रकार होता. या कुंचंब्यांतून लोकांना बाहेर काढून गांधींनीं आपल्या उदाहरणानें सुधारणेचा मार्ग दाखविला, असें पुढील चरित्रावरून कोणासहि कळून येईल. आफ्रिकेंतील हिंदी लोकांस त्यांच्या विपन्नावस्थेतून सोडविण्यास गांधी यांनी काय केलें याचेंहि जरा सूक्ष्म रीत्या अवलोकन केलें पाहिजे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .