पुढें एकदां आम्ही बैलगाडीतून एक हिंदी गाणें उच्च स्वरांत म्हणत जात होतों. घुंगरांच्या तालांत बैल पळत होते. दुपारी ३ || चा सुमार असावा. आमचे पुढे दोन फर्लांगावर एक इसम दोन्ही हातांत पिशव्या घेऊन चालला होता. आमचा ध्वनी ऐकून तो थबकला. आमची बैलगाडी त्याचेपाशी पोचतांच त्याने गाडीवाल्यास थांबविलें. तो एक पंजाबी तरुण होता. आम्हांला पाहून त्याला अत्यानंद झाला होता. तो कांही वर्षांपूर्वी पंजाबांतून, आपलें खेड्यांतून निघून विश्वाच्या या सांदीकोपऱ्यांत येऊन पडला होता. बऱ्याच दिवसांनी भारतीय व्यक्ति पाहून त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. अत्याग्रहानें त्यानें गाडी दोन मैलांवर असलेल्या त्याच्या श्वशुरगृहाकडे वळवली. गव्हाची कांपणी नुकतीच होऊन मळणी वगैरे चालली होती.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .