डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनांतील महत्त्वाचे झगडे अनेक आहेत. महाडच्या चवदार तळ्यांत पाणी भरण्याचा झगडा, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश झगडा, रामाचा रथ ओढण्याचा हक्क सांगण्याचा झगडा, पर्वति मंदिर प्रवेश सत्याग्रह, अमरावती मंदिर प्रवेश सत्याग्रह हे प्रसंग पाहिले तर ते सर्व समतेच्या राजकीय, सामाजिक व धार्मिक हक्क प्राप्तीसाठींच होते. स्पृश्यांच्या मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी जीव धोक्यांत घालून झगडणारे आंबेडकर हे हिंदुधर्माभिमानी नाहीत, उलट वैरी आहेत, असे समजण्यांत स्पृश्य हिंदूंची मोठी घोर चूक झाली व गैरसमजामुळे हिंदुत्वाचें फार मोठे नुकसानच झालें.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .