मुंबईचा किनारा सोडल्यावर पांच दिवसांनी पुनः जमिनीचे दर्शन घडलें, समुद्र अगदीं शांत असल्यानें आमच्या प्रवासाचा आरंभ तर खूप मजेत झाला; परंतु रोजच्या रोज वर आकाश व खाली पाणी या खेरीज दुसरें कांहीं पहावयास न मिळाल्याने आम्हाला जमीन केव्हां दिसेल असें होऊन गेलें. उन्हांत राहिल्या खेरीज सावलीची किंमत कळत नाहीं असें म्हणतात; त्याचप्रमाणें जमिनीची किंमत पाण्यांत राहिल्याखेरीज कोणांस कळावयाची नाहीं; जेव्हां अरबस्तानच्या किना-यावरील डोंगरांचे दुरून अंधुक दर्शन घडलें तेव्हां एखादा हरवलेला ठेवा सांपडावा याप्रमाणें सर्वांस आनंद होऊन डेकवर ते डोंगर पहाण्यास प्रवाशांची गर्दी उडाली !
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .