नायिकेच्या मोहक सौंदर्याचे हे विविध नमुने केवळ वानगीदाखल मीं दिले आहेत. केवळ अशा प्रकारचें बाह्यस्वरुपाचें वर्णन करून शाहीर थांबले आहेत असें नाहीं. नायक दूर गेल्यामुळें नायिकेची होणारी व्याकुळ विरहावस्था व तिचीं दुःखें शाहिरांनी रेखाटलीं आहेत. पति प्रवासाला गेला आहे व त्यामुळे नायिकेची अवस्था करुणास्पद झाली आहे. तिला विरहानलाचा दाह असह्य होत आहे. या अवस्थेचें चित्रणहि शाहीर यथार्थ शब्दांत करतात. अशा स्थितींत असलेली नायिका म्हणते,
“पति प्रवासामधें सखे मी येकली मंदिरीं ।
कंठं कोणाच्या बळें पाठवा पत्र लिहून या तरी ॥
झुरझुरून पांजर झाले शरीर निपट राहिलीं हाडें ।
रात्रंदिवस घोकणी पतीच्या लक्ष वाटेकडे ।।”
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Rajesh Kate
2 आठवड्या पूर्वीमाझा मऱ्हाटाचि बोलू, परि अमृतातेही पैजा जिंके... ! अप्रतिम लिखाण..... मनाला भावले ! तृप्त झाले मनमानस !! अनंत अनंत शुभकामना तथा लक्षलक्ष शुभाशीर्वाद!!!