१९३०-३२ च्या स्वातंत्र्यलढयांत महाराष्ट्रांतील काँग्रेसमध्ये जेथे यांच्या नेतृत्वाखाली फार मोठा ब्राह्मणेतर समाज सामील झाला. त्या लढ्यात भारतीय कम्युनिस्ट सामील झाले नाहींत आणि महाराष्ट्रांतील कम्युनिस्ट जे सामील झाले ते निव्वळ विघ्नसंतोषीपणाने सामील झाले. राष्ट्रीय लढ्याच्या मुख्य प्रवाहापासून कम्युनिस्ट तेव्हांपासून जे बाजूला पडलेले आहेत ते अजूनहि बाजूलाच आहेत. १९३०-३२ च्या लढयांत महाराष्ट्र काँग्रेसमध्यें तीन प्रकारची माणसें होती. टिळकांच्या मृत्युनंतर सुरू झालेल्या गांधींच्या चळवळींत सामील झालेले जुने नवे कार्यकर्ते. १९२७-२८ पासून नेहरू व सुभाष चंद्र यांच्या स्फूर्तीनें काँग्रेसमध्ये आलेले सुशिक्षित तरुण आणि १९३०-३२ च्या चळवळींत आलेला ब्राह्मणेतर समाज हे ते तीन प्रकार होत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .