या लहानग्या चार ओळींच्या कवितेत काय नाहीं? ढग आहे, विजा आहेत, पाऊस आहे आणि चिखलहि आहे. एवढेच काय, बर्वे-पूर्व पुण्याचें चित्रहि शेवटची ओळ वाचून जाणत्या वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे राहिल्याशिवाय रहाणार नाहीं! आकाश आणि जमीन यांना अवघ्या चार ओळींत सामावून टाकणारी व शिवाय स्थलवैशिष्ट्यपूर्ण अशी कविता जगाच्या वाङ्गमयांत तरी सांपडेल काय?
यंत्रयुगांत भरडल्या जाणाऱ्या मानवी भावनांबद्दल लोहकवींना तळमळ असली तरी उगाच भावनावश होऊन टिपे गाळणाऱ्या लोकांबद्दल त्यांना सहानुभूति नाहीं. पिंपांत मेलेल्या उंदरांना त्यांनीं केलेला रोकडा सवाल पहा:
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .