“बायकांना काय एवढं कळतंय ? बायकांची बुद्धी दोन अंगुळें, पण विचारतांच म्हणून सांगत्यें कीं प्रश्न आला कीं उत्तर सुचतें. व्यापाऱ्यानें सत्य आणि असत्य याचा संधी करायचा असतो. कर्मापासून माणसानें कर्धी दूर होऊ नये. कारण एक तर तुम्हांस मुलगा झाला आहे हें सत्य आहे पण त्याला व्यंग आहे हे सांगूच नये. तें त्याच्या गुणांत वर्णावें. सत्यवर्णनानें संकटमुक्ति होत नाहीं. पांडवांनी अश्वत्थामा मेला म्हणून खरें खोटें मिळविलें. आणि संकट टाळले. अमृताच्या सागरांप्रमाणे त्या कुबेराची संपत्ति आपल्या घरांत या मुलीच्या पायांनी येणार. तर ती संपत्ति आपल्यासारख्या बुद्धिवंतानें लाथाडावी काय ?"
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .