गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवाने दिग्दर्शनातील अनेक खाचाखोचांचा मला नीट परिचय झालेला; दिग्दर्शक कुठे चुकतो, कुठे बरोबर आहे; कोणता प्रसंग त्याने कसा फुलविला आहे, तो आणखी कोणत्या प्रकारे चित्रित करता आला असता याचे ज्ञान मला होते. अनेकदा माझ्या मनाप्रमाणे मला प्रसंग चित्रीत करता येत नसत; माझे पुरते समाधान होत नसे, तेव्हा मग मी मनाशीच निर्णय घेतला की आपल्याला संपूर्ण समाधान लाभायला हवे असेले तर सर्वच गोष्टी स्वतः करायच्या. म्हणून मग मी लेखणी हाती घेतली. कल्पना भराभर कागदावर लिहून काढल्या. त्या लोकांपुढे सादर कशा करायच्या याचे आराखडे तयार केले नि त्यासाठी दिग्दर्शनाची सूत्रे आपल्या हाती घेतली.”
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .