अबदुल रहिमान यांनी मराठ्यांचे तर्फेनें प्रतिनिधीस कुमकेस बोलाविलें. परंतु प्रतिनिधीची डाळ शिजली नाहीं, एवढेच नव्हे, तर शिद्दयानें कोंकण प्रांतांत स्वाऱ्यांवर स्वाऱ्या करून मराठ्यांस 'दे माय धरणी ठाय' करून टाकिलें. श्री. बाजीराव साहेबांचे धाकटे बंधु चिमणाजी आप्पा हेही कोंकणांत जाण्यास कांकूं करूं लागले. दुसरेही कोणी सरदार हबशावर चढाई करून जाण्यास धजेनात. तेव्हां महाराजांनी माळव्यांत श्री. बाजीरावांस आज्ञापत्र पाठविलें कीं, हर कामें बाजूस ठेवून कोंकणचा बंदोबस्त करा. हें आज्ञापत्र (बापटकृत श्री. बाजीराव बल्लाळ, पृष्ट १३९.) श्रीमंतांचे चरित्रांत दिलें असल्यामुळे त्याची येथें द्विरुक्ति करीत नाहीं
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .