महाराष्ट्राबाहेरचे पण साहित्याचे साधक म्हणून महाराष्ट्राला परिचित असे श्री. राजेन्द्रसिंग बेदी यांना त्यांच्या “एक चादर मैली सी" ह्या उर्दू कादंबरीबद्दल अकादमीचे पारितोषिक मिळाले आहे. तर डॉ. नगेन्द्र ह्यांना 'रससिद्धान्त' ह्या पुस्तकाबद्दल अकादमी पुरस्कार मिळाला आहे. कर्तारसिंग दुग्गल हे नांवही मराठी वाचकांच्या कानावरून गेले आहे. कारण त्यांच्या काही कथांचे मराठी अनुवादही झाले आहेत आणि हिन्दी जाणणाऱ्या मराठी वाचकांना तर ते नांव सुपरिचित आहे. त्यांच्या मनात डॉक्टरेट मिळवावी असे होते. परंतु त्यांना ते जमले नाही. परंतु त्यांनी २२५ चे वर ज्या कथा लिहिल्या आहेत त्यांचा अभ्यास मात्र एखाद्या साहित्याच्या विद्यार्थ्याला डॉक्टरेट मिळवून देऊ शकेल.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .