विनोबांच्या बरोबर चालतांना तिरपीट होत होती व घाईनें चालावे लागत होते. पण कुठल्याहि परिस्थितीला आपण कमी पडणार नाहीं अशी श्रद्धा असल्यानें नेहमींपेक्षां अधिक गति माझ्या पायांत आपोआप आली होती. थोड्या वेळानंतर खडकवाड्याच्या शिवारांत आम्ही आलों. गांव अगदी नववधूप्रमाणें नटला होता. हरिजनांच्या वस्तींतून जातांना तर स्वच्छतेने उच्चांक गांठला होता, जणू कांहीं युगायुगाचे औत्सुक्य त्या गांवच्या आश्रयाला आलें होतें, कुतुहल टवकारून पाहात होतें, भावना विनम्र झाली होती. हजारों व्यक्तींतून कोणीतरी एक वावरत आहे असें भासत होतें.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .