नंतर युनेस्कोकडे केलेल्या अर्जामुळे पांच हजार डॉलरची मदत आली आणि या ग्रंथाचें 'Antre Mon Frere Chand' या नांवानें फ्रेंच भाषांतरहि झाले. या तिन्ही भाषांतील नऊ हज़ार प्रतींपैकीं एकंदर तेवीस प्रती खपल्या. पण त्याहि वाचल्या गेल्या नाहीत. त्यामुळे आचार्यांचे विचार प्रसृत होईनात. पण आचार्य निरुत्साही झाले नाहींत. त्यांनी आपले प्रचारकार्य चालूच ठेवलें. 'बालबोध शिक्षण', 'प्रत्येकाचें शिक्षण', "Everybody's Education' इत्यादि पुस्तकें त्यांनी लिहिली. आचार्यांना एकच हळहळ वाटते. ते तुरुंगांत गेले नाहींत. आपण तुरुंगांत लेखन करावें अशी त्यांची लहानपणापासून दुर्दम्य इच्छा.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .