अंक - रसरंग, दीपावलि विशेषांक १९५९
रात्री ८ वाजतां सुरू झालेला तो कार्यक्रम १२।। वाजेपर्यंत अखंड चालला होता. अन् तेवढ्या अवधीत लताबाई क्षणांत प्रेक्षागृहांत कोणा मान्यवर नेत्याच्या सान्निध्यांत दिसत, तर क्षणांत त्या रंगपटांत कोणाशी तरी हितगुज करतांना आढळत; क्षणांत त्या दूरध्वनिक्षेपकासमोर उभ्या राहून वाद्यवृंदाच्या साथीसह एखादें सुरेल गीत आळवीत असलेल्या दिसून येत, तर क्षणांत त्या इतर गायक-गायिकांच्या कार्यक्रमाची जुळवाजुळव करतांना दिसत. बाईला मुळीं क्षणाचीहि उसंत नव्हती ! त्यांचा त्या वेळचा तो उत्साह, अेखाद्या कडव्या राजकीय कार्यकर्तीलाहि लाजविणारा होता. हातीं घेतलेली कामगिरी सर्व दृष्टीनें यशस्वी करण्याचा एकच ध्यास मनीं लागून राहिलेला अन् त्यासाठी लागेल तितकें रक्त अटविण्याचा कृतनिश्चय
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Abhay Kulkarni
2 महिन्यांपूर्वीहा लतादीदी वरचा लेख वाचून धन्य धन्य वाटलं.
Suhas Kulkarni
3 महिन्यांपूर्वीवाह. हे जुने लेख वाचून खूप छान वाटलं. आम्ही तेव्हा लहान होतो. गोरेगावला राहायचो. घरी संगीत क्षेत्रातील व्यक्ती यायच्या. चांगलं वातावरण होतं.