हॉटेलांत जाऊन भजीं खाणें हें माझ्या बालपणीं गोहत्येच्या जोडीचें पातक मानण्यांत येत असे. घरांतला तीर्थरूप म्हणवून घेणारा वैरी–शाळेंतला मास्तर नामक गनिम आणि वयानें वडील असणारी तीर्थरूपांचे स्नेही नांवाची कौरवसेना गांवांतल्या हाटेलांच्या पायऱ्यांवर सदैव टेहेळणी करीत बसल्यासारखी असे. आल्या गेल्या पाहुण्यांनीं खाऊसाठीं म्हणून दिलेले पैसे लगेंच जप्त होत. ते पैसे बोरू घोरपडे शाईची पुडी–कित्ते वगैरे आणण्यासाठीं खर्च होत. इतिहासांतल्या औरंगझेबाबद्दल साऱ्या दुनियेला चीड असेल. पण बापाला स्वतःच्या हातांनीं नजरकैदेच्या बेड्या घालणारा औरंगझेब हा माझा आदर्श होता. असली पुत्ररत्नें जन्माला आल्याखेरीज 'बाप' नांवाचें हिंस्र श्वापद वठणीवर येणें शक्य नाहीं, याची मला खात्री होती.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .