अंक:- 'श्रावण' दिवाळी १९९४
१२ जून १९८० ची सकाळ. वार गुरुवार, वेळ सकाळचा ८ चा सुमार असेल. रेस्कॉन कंपनीला सुट्टी असल्यामुळे जरा उशिराच उठलो होतो. बाहेर बुलेट मोटारसायकलचा आवाज आला म्हणून डोकावलो, तर दारात माझा मित्र डॉ. विवेक परांजपे हजर. मी त्याला विचारले, “अरे एवढ्या सकाळीच काय काम काढलेस?” त्यावर तो बोलला, “आज एका शाळेत माझे व्याख्यान आहे व त्यासाठी मला एक चांगला नाग दे.” डॉ. विवेक परांजपे हा ‘फ्रेंडस् ऑफ अॅनिमल्स’ या संघटनेचा निर्माता व मुख्य प्रवर्तक होता व तो सर्पासंबंधीच्या गैरसमजुती व भीती लोकांच्या मनातून दूर करणे, यासाठी आपल्या संघटनेतर्फे निरनिराळ्या ठिकाणी जिवंत साप बरोबर नेऊन व्याख्याने देत असे. त्यावेळेला माझ्याजवळ विषारी-बिनविषारी असे पन्नासच्या आसपास साप होते, त्यात डझनभर नाग होते. मला विवेकने नाग मागितल्यावर मी पिंजऱ्यातून चार मोठे व निवडक नाग माझ्या ‘हूकस्टीक’ने बाहेर काढले. ते चारही नाग संथपणे फणा काढून आमच्या हालचाली पाहात उभे होते. आणि तेवढ्यात विवेकचे लक्ष एका बाजूच्या पिंजऱ्यात ठेवलेल्या नागाकडे गेले व त्याने मला त्या नागासंबंधी विचारणा केली की, ‘हा नाग सुंदर दिसतोय. केव्हा पकडलास?’ मी त्याला सांगितले, की त्याला पकडून फक्त पाच दिवस झाले आहेत. त्याने तो नाग मला बाहेर काढावयास सांगितले. मी शांतपणे ‘हूकस्टीक’ने त्या नागाला पिंजऱ्यातून बाहेर काढला व समोर जमिनीवर ठेवला, क्षणार्धात तो साडेचार फुटी नाग आपला फणा उभारून जवळजवळ दीड फूट उभा राहिला. तो त्वेषाने थरथरत होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ashokacharekar
7 वर्षांपूर्वीAtishay changla ani mahitipurn lekh.
Parvani
7 वर्षांपूर्वी????
CDKavathekar
7 वर्षांपूर्वीमृत्युच्या दारातून परत आल्याचा विदारक व उत्कंठा पूर्ण अनुभव
deepa_ajay
7 वर्षांपूर्वीअतिशय सुंदर साप चावल्यास काय होते हे पहिल्यादा कळलं मनपुर्वक आभार
prashasnt
7 वर्षांपूर्वीBest!?
prashasnt
7 वर्षांपूर्वीBest!?
prashasnt
7 वर्षांपूर्वीBest!?
prashasnt
7 वर्षांपूर्वीBest ?
bookworm
7 वर्षांपूर्वीउत्कंठावर्धक लेख! साप चावल्यानंतर माणसाची अवस्था काय होत असेल याची पूर्ण कल्पना आली, अशा व्यक्तीस प्रथमोपचार व तज्ज्ञ वैद्यकीय मदत तातडीने मिळणे व योग्य तऱ्हेने मिळणे किती आवश्यक आहे हेही लक्षात आलं. ग्रामीण भागात अशा सुविधांची खूपच जास्त निकड आहे.