दुपारचे चार वाजून गेलेले असतात. पाच-सहा पत्रं अजून टाइप करून व्हायची असतात. एक जांभई दीर्घकाळ तोंडात रेंगाळते. पाच-दहा मिनिटं टाइपराइटरवर डोकं टेकून झोपावसं वाटतं. ही साधी इच्छा आवरणं अगदी भाग असतं. मी असं बेशिस्तपणे पाच मिनिटं विसावण्यामुळं काहीही घडू शकतं; म्हणजे अगदी माझी नोकरीसुद्धा फूss होऊ शकते. खरंच असं घडलं तर? मुक्त जीवनाच्या गोड कल्पनेभोवती मन रेंगाळतं; पण जीवन कुठं मुक्त आहे? आई-बाबांच्या डोळ्यांतली ती माझ्या लग्नाची काळजी? ‘एक सुंदर पिंजऱ्यात अडकलेली मी एक चिमणी-’ असं काहीतरी मनात तरंगून जातं. मी नोकरी करणारी एक तरुणी. खरंच, या तरुणपणाचा हिशोब मांडावा का, असा प्रश्र्न नजरेसमोर तरळतो; आणि अचानक त्या प्रश्नाचे शब्द विस्कटून जातात. एक बोथट चेहरा तिथं आकार घेतो. माझी तंद्री नष्ट होते. गोपालन माझ्या टेबलासमोर उभा असतो. माझ्या कपाळावर एक आठी उमटते. तो समोर उभा आहे. याकडं मला पूर्ण दुर्लक्ष करायचं असतं. तो आता रोजच्यासारखाच गुरगुर करणार ‘अजून टाइप नाही का झालं मिस्? साला, यहाँ काम करते तीन बरस हो गये। फुकटका पगार खाती है, -’ गोपालन म्हणजे माजलेला कुत्रा आहे. ‘ओबिडियंट डॉग!’ माझे बंद ओठ पुटपुटतात.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
kiran.kshirsagar
8 वर्षांपूर्वीsmanisha
8 वर्षांपूर्वीKhup chhan?
अनिरुद्ध
8 वर्षांपूर्वीpraj9975
8 वर्षांपूर्वीवाह! एकदम आवडली.
किरण भिडे
8 वर्षांपूर्वीMangesh Nabar
8 वर्षांपूर्वीही कथा आज 'पुनश्च'साठी निवडण्याचं कारण काय हे विचारावंसं वाटतं. मंगेश नाबर