अंक : साप्ताहिक ‘भीम चक्र’ दि. १५-४-७६ वरून साभार उद्धृत
अप्पा रणपिसे नावाचे एक दलित कार्यकर्ते मुंबईत होते. ते अशिक्षित होते आणि रेल्वेत शिपाई होते. परंतु दलित समाजातील लोकांनी पुस्तकं वाचावीत यासाठी त्यांनी खूप धडपड केली. वरळी पोलिस लाईनजवळ एक कचराकुंडी हटवून त्यांनी तिथे लायब्ररी सुरू केली आणि कालांतरानं ती कायमस्वरुपी झाली. मुंबईत त्यांनी त्या काळी अशी खूप छोटी छोटी वाचनालयं सुरु केली. त्यांनीच बौध्द साहित्य परिषदही सुरु केली होती.
बाबासाहेबांनाही वाचनाचं अपार वेड होतं. त्यांचा ग्रंथसंग्रह अफाट होता. खुद्द बिर्लांनी बाबासाहेबांना तो ग्रंथसंग्रह ४ लाख रुपयांना मागितला होता. प्रसिध्द संपादक आणि विचारवंत अरुण टिकेकर यांचे काका श्री. रा. टिकेकर हे मोठे ग्रंथप्रेमी होते आणि बाबासाहेबांचे ते स्नेही होते. श्री. रा. टिकेकरांचे एक ग्रंथप्रेमी मित्र वारले तेव्हा त्यांच्या संग्रहातील पुस्तकांची यादी त्यांच्या वारसांनी टिकेकरांकडे दिली. बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम लक्षात घेऊन टिकेकरांनी ती बाबासाहेबांकडे पाठवली. बाबासाहेबांनी त्यातले काही ग्रंथ निवडले परंतु ती यादी परत पाठवायला ते विसरले. काही दिवसांनी त्यांना ते आठवलं, तोवर टिकेकरांनी ते ग्रंथ आणखी कुणाला तरी विकले होते. बाबासाहेबांनी त्या गृहस्थाला गाठून दुप्पट किंमत देऊ केली आणि हवे ते ग्रंथ ताब्यात घेतले.
वा.वि. भट यांनी राजाराम शास्त्री भागवत यांच्यावर एक छोटं पुस्तक लिहिल होतं. महारांवरुन महाराष्ट्र हे नाव पडलं असं ऐतिहासिक पुराव्यांनिशी सिध्द करणारी पहिली व्यक्ती म्हणजे राजाराम शास्त्री.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Rdesai
6 वर्षांपूर्वीअगदी बरोबर .
नंदकुमार
7 वर्षांपूर्वीतक्षशीला, नालंदा मुसलमानांनी झाळली, नाहीतर खुप खरं बाहेर आलं असतं।
Baban Nimbalkar
7 वर्षांपूर्वीNice very good to read
Dr Nagesh Tekale
7 वर्षांपूर्वीToo good and excellent