ते वसंत चे दिवस !


दुसऱ्या महायुध्दाची धामधूम सुरु असतानाच १९४२ च्या ऑगस्ट महिन्यात गांधीजींनी 'छोडो भारत'चा नारा दिला. भारताच्या भूमीतली आपली पाळं मूळं ढिली होत असल्याचं पाहून ब्रिटिशांनी राजकीय,सांस्कृतिक आणि सामाजिक बंधनांचा फास अधिकच आवळायला सुरुवात केली होती. अशा काळात दत्तप्रसन्न काटदरे यांनी 'वसंत' मासिक सुरु करण्याचा घाट घातला. मासिक सुरु करण्यास परवानगी नाही, कागदाची टंचाई आणि देशी भाषांमध्ये प्रसिध्द होणाऱ्या प्रत्येक शब्दाविषयी राज्यकर्त्यांना संशय अशा वातावरणात 'वसंत' सुरु ठेवण्यासाठी काटदऱ्यांना काय काय करावे लागले याची सुरस कहाणी त्यांच्याच शब्दात. वसंतच्याच एका अंकात १९६० साली त्यांनी लिहिलेला हा लेख- ************** अंक - वसंत;  वर्ष- जुलै १९६० १९४३!  त्या वेळी भारतात इंग्रजांचे राज्य होते. दुसरे महायुद्ध भडकलेले असून संबंध जगापुढे भयंकर परिस्थिती उभी होती. हिटलरने ब्रिटिश साम्राज्याला असा काही तडाखा दिला होता की हे साम्राज्य कसे सावरून धरायचे हा इंग्रज मुत्सद्यांपुढे एक मोठा प्रश्न होता. त्यामुळे हिंदुस्थानातली राज्यव्यवस्था अगदी कसोशीने व काटकसरीने त्या ब्रिटिश नोकरशाहीने चालविली होती. आपल्याविरुद्ध शक्य तितके कोणी बोलू नये, लिहू नये या हेतूने नव्या वृत्तपत्रांना अजिबात बंदी घालण्यात आली होती. केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय कोणतेही वृत्तपत्र, साप्ताहिक किंवा मासिक काढणे अशक्य होते आणि ही परवानगी सहसा कोणालाही देण्यात येत नसे. अशा काळात ‘वसंत’ मासिक सुरू करण्याची मला प्रेरणा झाली किंवा सुरसुरी आली म्हणा; पण निश्चय झाला. १९४३ च्या नोव्हेंबरमध्ये ‘वसंत’चा पहिला अंक, दिवाळी अंक, म्हणून प्रसिद्ध झाला. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी नियतकालिकांचा इतिहास , वसंत , अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. Pushkar1210@gmail.com

      7 वर्षांपूर्वी

    इच्छा तेथे मार्ग हेच सिद्ध होते. वसंतच्या जन्मदात्यांच्या प्रयत्नांना सलाम

  2. ajitpatankar

      7 वर्षांपूर्वी

    “वसंत”ची जन्मकहाणी वाचली. झालेल्या त्रासाचे glorification केले आहे असे वाटते. जन्म देताना प्रसूतिवेदना होणारच. मुळात “मुहूर्त” चुकला हेच खरे !! त्यांना निदान, खूप दिग्गजांचा पाठींबा तरी होता. यापेक्षा समान्य माणसांनी against all odds , काही भव्य दिव्य केले तर ते जास्त प्रशंसनीय असते.. बिल गेट्स किंवा लॅरी पेज/सर्जी ब्रिन हि काही उदाहरणे....

  3. vasantdeshpande

      7 वर्षांपूर्वी

    काटदरे यांच्या चिकाटीचे आणि अथक परिश्रमांचे आश्चर्य वाटते. त्याचबरोबर तत्कालीन थोर व्यक्तींनी दिलेला पाठिंबाही थक्क करून सोडतो.

  4. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    आपल्या सभासद विभागात 'logout', 'प्रोफाईल' आणि 'पासवर्ड बदला' ही बटन्स बाजूबाजूला आहेत. आपण कॉम्प्युटर समोर बसलो आहोत तर आपल्या उजव्या हाताला. कृपया ते वापरून बघा. काही अडचण वाटली तर सांगा.

  5. Meenalogale

      7 वर्षांपूर्वी

    दत्तप्रसन्न काटदरेंच्या जिद्दीला आणि चिकाटीला सलाम.मी हे मासिक वाचत असे.

  6. Mangesh Nabar

      7 वर्षांपूर्वी

    आता काही वेळाने चिकाटीने प्रयत्न करून मी हा लेख वाचू शकलो. त्या काळात म्हणजे पारतंत्र्यात वसंत हे मासिक सुरु करताना आर्थिक बाबी सोडून मुख्य कायदेशीर अडचणीवर कै. दत्तप्रसन्न काटदरे यांनी कशी मात केली हे वाचताना आजही रोमांचक वाटले. मी वसंत हे मासिक त्यांच्या काळात वाचत होतो. त्यांच्यानंतर मात्र ओहोटी लागली. मंगेश नाबर

  7. suhaskadlaskar

      7 वर्षांपूर्वी

    Facility to change the password is not possible on the sight. It’s not appearing anywhere

  8. Mangesh Nabar

      7 वर्षांपूर्वी

    प्रिय संपादक पुनश्च यांस, सप्रेम नमस्कार यापूर्वी मी आपल्याला आपल्या या नियतकालिकाच्या तांत्रिक दोषाबद्दल लिहिलं होतं. आजही मला तसाच अनुभव आला. मी चक्क २ वेळा माझं यूजर नेम आणि पासवर्ड टाकला तरी मी "ते 'वसंत'चे दिवस " हा लेख वाचू शकलो नाही. अत्यंत खेद झाला आणि मी हा प्रयत्न सोडून देऊन आपला आलेला मेल काढून टाकला. हा असा अनुभव अधूनमधून का येतो ? मंगेश नाबर

  9. bookworm

      7 वर्षांपूर्वी

    स्वातंत्र्यपूर्व काळात सरकारी धोरणात न बसणारी गोष्ट करायची असेल तर किती संघर्ष करावा लागे ह्याची कल्पना आली.... हॅट्स ऑफ!

  10. praj9975

      7 वर्षांपूर्वी

    हि जिद्द काही समजत नाही मला. पदरमोड करुन मासिक वगैरे काढायचं. पण विलक्षण कौतुक मात्र वाटल्याशिवाय रहात नाही.असूयाही वाटते. हि माणसं पैसा आणि भविष्याची तरतूद अशा राक्षसांपासून कोसो दूर असतात. बरं वाटतं जगात अशी मनस्वी, passionate माणसं बघून. लेख सुंदर.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts