विमान-तंत्रज्ञांना कुत्र्याचा हेवा वाटतो तेव्हा !


संपूर्ण भिजलेलं असं कुत्र तुम्ही पाहिले आहे का? स्वत:चं अंग फडफडून तुषारांची चौफेर उधळण करून ते पाहता पाहता नखशिखांत कोरडे होते! याच कारणामुळं विमान-तंत्रज्ञांना कुत्र्याचा हेवा वाटत असे. विमान-तंत्रज्ञांना आंघोळ केल्यावर टॉवेल वापरण्याचा कंटाळा आला होता म्हणून त्यांना कुत्र्याचा हेवा वाटत होता असं मात्र नाही. त्यांची समस्या वेगळीच होती. ‘बर्फा’ची नव्हे मृत्यूची मगरमिठी! अलीकडे जेट विमान फार उंचावरून जवळ जवळ १२-१३ किलोमीटर्स उंचीवरून उडतात ही गोष्ट सर्वांना ठाऊकच आहे. तेथे हवा एवढी थंड असते की. विमानाच्या पंखावर बर्फाचे थरच्या थर जमू लागतात. त्यामुळे विमानावर निरूपयोगी बर्फाचा टनावारी भार पडतो. (विमानात निरुपयोगी वजन थोडे जरी वाढले तरी इंधन खर्च भराभर वाढत जातो.) हा एक तर तोटा होतोच पण विमानाच्या पंखांचा व शेपटीचा गणिताने निश्चित केलेला आकारही बेडौल होऊन जातो व त्यामुळे हवेच्या लाटांवर पेललेल्या विमानाची उद्धरण शक्ती झपाट्याने कमी होते. जर हा बर्फ दूर करण्याचा मार्ग शोधता आला नाही तर विमानाला आपले उड्डाण ५-७ मिनिटातच आटोपते घ्यावे लागते. शीतप्रदेशात हिवाळ्यात तर ही समस्या अतिशयच कठीण होते. विविध मार्ग यावर अनेक उपाय करण्यात आले. पण ते एकतर पुरेसे परिणामकारक नव्हते किंवा खर्चिक होते. उदाहरणार्थ विमानावरून गरम हवा खेळवण्याची पद्धत किंवा विमानाच्या शरीरात विद्युतप्रवाह खेळविण्याची पद्धत. ही पद्धत अतिशय खर्चिक आहे त्यामुळे दर चौरस मीटर क्षेत्रफळावर ताशी १५-२० युनिट वीज खर्च होते. म्हणजे विमानाची १०-२० टक्के शक्ती यावरच खर्च होई. पाण्याने (अर्थात बर्फानेही) न भिजू शकणारा पापुद्रा किंवा द्रवतरंग विमानावर चढविण्याचे प्रयत्नही निष्फळच ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विज्ञान , सृष्टीज्ञान , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. MADHAVIMD

      5 वर्षांपूर्वी

    नविन माहिती मिळाली

  2. shailesh71

      7 वर्षांपूर्वी

    माहितीपूर्ण !

  3. bookworm

      7 वर्षांपूर्वी

    विलक्षण! अलौकिक प्रतिभा!

  4. अनिरुद्ध

      7 वर्षांपूर्वी

    छान! कुत्र्याचे उदाहरण चपखल वाटले. बारीक निरिक्षण केले तर मोठ्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं निसर्गात आपल्या जवळच आढळतात हे दिसून आलं

  5. ajitpatankar

      7 वर्षांपूर्वी

    वा !! उत्तम माहिती.. या तंत्राला Electro Impulse De-icing System (EIDS) किंवा Pulse Wave De-icing system म्हणतात एवढीच माहिती होती.. त्याची पार्श्वभूमी व शोधकर्त्याचे नाव माहित नव्हते. लेख वाचून छान वाटले.

  6. CHARUDATTA SHRIDHAR SHENDE

      7 वर्षांपूर्वी

    SUPERB !

  7. शरद कांबळे

      7 वर्षांपूर्वी

    अतिशय उदबोधक माहिती धन्यवाद



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts