बॉल्डविन एकदा म्हणाले होते, ‘‘उसनी आणलेल्या पुस्तकांपासून मिळणारा आनंद अत्यल्प असतो.’’ त्याच्या या मताशी मी संपूर्णपणे सहमत आहे. पुस्तक स्वत:चे असले म्हणजे ते एका बैठकीत वाचून काढण्याची गरज नसते. जेव्हा वाचावेसे वाटेल तेव्हा, जेवढे वाचावेसे वाटेल तेवढे, सावकाश, मजेने आणि निवांतपणे ते वाचता येते. असे पुस्तक वाचायला घेतल्यावर, ते वाचण्यासारखे असले तर एकाच बैठकीत पुरे करता येते, वाचीत असताना मनात आलेले विचार नोंदून ठेवता येतात व विशेष लक्षात ठेवण्याजोगा ओळींखाली तांबड्या पेन्सिलीने रेघाही ओढून ठेवता येतात. तसे पाहिले तर आपले मूल आणि दुसऱ्याचे मूल यांच्यामध्ये जो फरक असतो तोच स्वत:चे पुस्तक आणि दुसऱ्याकडून मागून आणलेले पुस्तक यांमध्ये असतो, हा माझा स्वत:चा अनुभव आहे. आणि त्यामुळे पैसे नसले तरी पुस्तके खरेदी करण्याची माझी सवय कायम आहे. स्वत: पुस्तके खरेदी न करता त्यांचा संग्रह मात्र करणारे काही भाग्यवान लोक असतात. वास्तविक पाहता ही गोष्ट अगदी साधी आहे. ‘‘जरा हे पुस्तक द्या ना, वाचून परत करीन’’ असे नम्रपणे म्हणून पुस्तक आणायचे आणि ते आपल्या संग्रहात ठेवून द्यायचे. पुस्तक देणारा मनुष्य लोभी असला व आपले पुस्तक परत करण्याचा लकडा लावू लागला ‘‘तर उद्या देतो’’ असे सांगून त्याची ब्याद निकालात काढता येते. दहा वीस वेळा अशी टोलवाटोलवी केली की तो कंटाळून जातो. किंवा, ‘‘तुमचं पुस्तक कुठे ठेवलंय ते सापडतच नाही. बहुधा हरवलं असावं; पण मी तुम्हाला नवीन घेऊन देतो.’’ असे सांगावे. तो माणूस सज्जन असला तर म्हणेल, ‘‘जाऊ दे हो; एवढं कशाला मनाला लावून घेता? तो तसे म्हणाला नाही तर, ‘‘उद्या विकत आणून देतो,’’ असे प्रत्येक भेटीच्या वेळेस सांगून बरेच दिवस ढकलता येतात. एवढे करूनही त्याने आपली मागणी ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
sakul
6 वर्षांपूर्वीनोकरीला लागल्यापासून आजपर्यंत कायम राहिलेले आणि जपलेले व्यसन म्हणजे पुस्तकांची खरेदी. माझ्या संग्रहात किती पुस्तके आहेत, हे मी अजून मोजले नाही. (म्हणजे काही हजार आहेत, असे नाही. तर केवळ कंटाळा!) संग्रहातील सगळी पुस्तके वाचलेली आहेत, असे मुळीच नाही. पण अमूक एक पुस्तक आपल्या संग्रहात आहे, याचा आनंद मोठाच. पण संग्रहाचं व्यवस्थित नियोजन करणं अजून जमलं नाही. पुस्तकं कशी जपावीत, हे श्री. अरुण टिकेकर यांनी लिहिलं आहे. ते वाचलं, तरी प्रत्यक्षात आणणं जमलं नाही. कोणी वाचतो, असे म्हटले की, मला संग्रहातील पुस्तक द्यायला फार आवडे. पण आता ते कमी केले. एकदा कार्यालयाच्या जवळ सुरू असलेल्या प्रदर्शनातून वीस-पंचवीस पुस्तके खरेदी केली. ती हळुहळू घरी नेऊ म्हणून कार्यालयातल्या कप्प्यात ठेवली. त्याच दिवशी एक वरिष्ठ सहकारी नेमका पुण्याहून नगरला आमच्या कार्यालयात आला होता. ती खरेदी अभिमानाने दाखविल्यावर त्याने दोन-चार पुस्तके वाचायला नेऊ का, असे विचारत पाच पुस्तके नेली. काही काळाने त्याने नोकरी सोडली व दुसऱ्या ठिकाणी रुजू झाला. यथावकाश तिथली नोकरी सोडून पुन्हा जुन्या संस्थेत आला. त्याने नेलेल्या पुस्तकांबद्दल धीर धरून दोन-चार वेळा विचारल्यावर त्याने एकदा तीन पुस्तके परत केली. पाच पुस्तके होती, असे सांगिल्यावर तो म्हणाला, ''माझ्याकडे तर तीनच आहेत. ती हीच. अन्य दोन पुस्तके कोणती? तुझ्याकडे यादी आहे का? तू तसं काही लिहून ठेवलं आहेस का?'' त्यांनी इतके तर्कशुद्ध उत्तर देऊन जो धडा शिकविला त्यापासून अजून काही शिकलो नाही. कमी केले तरी ती सवय अजून आहेच. अलीकडेच एकाने तीन पुस्तके नेऊन त्यातील एकच परत केले. बाकीची दोन कोणती हे त्याला आठवत नाही म्हणाला. (महत्त्वाचे म्हणजे या माणसाच्या घरातील पुस्तकांची संख्या पाच-दहापेक्षा जास्त नसणार.) 'चांगलं काही वाचायला द्यायचं' या सवयीमुळे संग्रहातील दोन पुस्तकं गमावली. पहिलं म्हणजे श्री. भानू काळे यांचं 'कॉम्रेड' आणि दुसरं श्री. अच्युत बर्वे यांचं 'सुखदा'. अतिशय आवडती पुस्तकं ही. कोणत्याही कार्यक्रमात पुस्तकं भेट देण्याची सवय आहे. आजवर सर्वाधिक भेट दिली आहे ती पुस्तके म्हणजे 'रारंगढांग' व 'एक होता कार्व्हर' (माझं स्वतःचं प्रकाशित झालेलं एकमेव पुस्तकही खूप जणांना भेट दिलं आणि त्यातल्या अनेकांनी ते वाचून साधा अभिप्राय देण्याचीही तसदी घेतली नाही, हा भाग वेगळा.) एक मित्रही (त्याला तेवढी आवड नसून) आता पुस्तकेच भेट देतो. ती आणण्याची जबाबदारी अर्थात माझ्यावर असते. पुस्तके भेट देण्याच्या या सवयीनेच श्री. प्रभाकर पेंढारकर यांच्याशी मिनिट-दीड मिनिट बोलण्याची संधी लाभली होती.
Vasant
7 वर्षांपूर्वीहाहाहा इतरांचे अभिप्राय वाचणेही मजेशीर आहे
avthite
7 वर्षांपूर्वीखूप छान वाटला लेख.. सध्या काही कारणांमुळे पुस्तक खरेदीचा योग आला नाही त्यामुळे एकदम nostalgic झाले
CDKavathekar
7 वर्षांपूर्वीमीही गेली 30/35 वर्षे पुस्तके विकत घेऊन वाचतो,कोणी मित्र व ज्येष्ठ नागरिक यांनी वाचावयास मागितल्यास देतो,आता माझेकडे भरपूर पुस्तके झालीत त्यातील काही पुस्तके मी ज्या माध्यमिक शाळेतून मी 11 वि पास झालो त्या शाळेस भेट देणार आहे,कारण पुढे मुलगा सून व नातवंड काही वाचन करतील असे वाटत नाही.
Aaidada
7 वर्षांपूर्वीमी पूर्वी पुस्तके विकत घेतली आता घेणे कमी केले आहे कारण घरात मराठी वाचन कुणी करत नाही ? इथे जवळपास ग्रंथालय नाही त्यामुळे माझे वाचन खूप कमी होत आहे ह्याची खंत वाटते, आता ebook चा सराव करणे गरजेचे आहे .
Vijay Trimbak Gokhale
7 वर्षांपूर्वीज्या वाचकांना संग्रह करायला आवडतो त्यांना वा मराठी ग्रंथ संग्रहालयासारख्या वाचनालयांना द्या. अन्य वाचकांना फायदा होईल आणि तुम्हाला सत्पात्री दान कारल्याचे पुण्य लाभेल.
sudhagokhale
7 वर्षांपूर्वीसुरेख. आता माझ्याकडे विकत घेतलेली जी पुस्तके आहेत १९६० पासूंची खरेदी, त्यांचं पुढे काय. माझ्या नंतर घरात वाचणार कोणीही नाही.
suresh johari
7 वर्षांपूर्वीलेख आवडला . मलाही पुस्तक विकत घेऊन वाचायला आवडते . माझ्याकडून वाचायला म्हणून नेलेली पुस्तके एक बहुदा परत मिळालेली नाहीत. त्यामुळे कुणाला माझी पुस्तके उसने देणे जीवावर येते .
nishachuri
7 वर्षांपूर्वीलेख 101% पटला. मलाही जड जाते कोणाला पुस्तके द्यायला :-|
arush
7 वर्षांपूर्वीpractically हे नक्कीच अवघड आहे कारण माझ्या घरात आता पुस्तकं ठेवायला खरच जागा नाहीये आणि पुस्तकं विकत घेऊ नको असं म्हणायलाही जीभ रेटत नाही कारण स्वत:ची
bookworm
7 वर्षांपूर्वीमलाही पुस्तके विकत घेऊन वाचायला आवडतात. उसने शक्य तो घेत नाही व घेतल्यावर वाचून झाल्यावर लगेचच परत करून टाकतो. माझ्याकडून वाचायला म्हणून नेलेली पुस्तके एक अपवाद वगळता परत मिळालेली नाहीत. त्यामुळे कुणाला माझी पुस्तके उसने देत नाही. लेख छान!
TINGDU
7 वर्षांपूर्वीलेख आवडला. डिजिटल पुस्तकात स्वतः च्या असो कि उसनवारीच्या कशी नोंद घेता येईल अंडरलाइन करता येईल हे माहित पडले तर बरे झाले असते.
ajitpatankar
7 वर्षांपूर्वीछान लेख... मी दरवर्षी साधारण पाच हजारांची पुस्तके विकत घेतो.. हा उपक्रम गेली कित्येक वर्षे चालू आहे.. संग्राह्य पुस्तके घरी ठेवून उर्वरित पुस्तके माझ्या ऑफिसमधील ग्रंथालयाला देवून टाकतो.. ऑफिसच्या ग्रंथालयातील ५०% पुस्तके मीच दिलेली आहेत.. वरील लेखात म्हटल्याप्रमाणे, अनेकदा दुसऱ्यांना वाचायला दिलेली पुस्तके परत मिळत नाहीत.. हा सार्वत्रिक अनुभव आहे.. खूप विचार करून देखील असं करण्यामागचे कारण कळले नाही.. कित्येकदा पुस्तक घेतल्याचे त्यांना आठवतही नाही.. एक विनोद आहे:- “कुणालाही पुस्तके वाचयला देऊ नयेत, कारण ती परत येत नाहीत.. माझ्याकडे असलेली सर्व पुस्तके अशीच आहेत”...........
Anjali Joshi
7 वर्षांपूर्वीखरे आहे. एखादे पुस्तक आवडले की आपल्या परिचित व्यक्तींबरोबर त्याबद्दल चर्चा /प्रशंसा करायला खुप छान वाटते. परंतु लेखात म्हटल्याप्रमाणे त्याचे परिणाम भोगावे लागतात. मला पुस्तके खरेदी करायला खुप आवडते. आपले पुस्तक वाचण्याची मौज आगळीच आहे. माझ्या जवळ खुप पुस्तके आहेत. पुस्तकाला कव्हर घातल्याशिवाय मी वाचत नाही. पुस्तकांचे आणि वाचनाचे फारच वेड आहे मला. पुस्तकांना खुप जपते मी, वाचायला देते मी बर्याच जणांना पण परत आणून द्या असे सांगून. जिव्हाळ्याचा विषय आहे हा. जरा जास्तच लिहीले.
Mangesh Nabar
7 वर्षांपूर्वीस्वतःची पुस्तके असण्याचे बरेच लाभ आणि काही तोटे असतात. आपल्या संग्रहातील पुस्तकांची निगा आणि जपणूक आपली आपणच केली पाहिजे. लोकमान्य टिळक एकदा मुंबईच्या ट्राममध्ये वृत्तपत्र वाचत होते. त्यांचे उतरण्याचे ठिकाण आल्यावर एका अनोळखी प्रवाशाने ते मागितले. टिळकांनी त्याला एक आणा दिला आणि ते विकत आणण्यास सांगितले अशी एक आख्यायिका आहे. थोडक्यात, आपले पुस्तक कोणालाच देऊ नये. अर्थात लोकमान्यांप्रमाणे आपण त्याची किंमत मात्र देऊ शकणार नाही. तरी मर्म लक्षात घ्यावे. प्रस्तुत लेख अनुवादित दिसतो. कोणी अनुवाद केला आहे ते आढळले नाही. त्याचा उल्लेख करावा ही विनंती. मंगेश नाबर
mikund parrlkar
7 वर्षांपूर्वीi had 3000 books but ultimately I have to dispose them as the pages became brittle over the time span of 40 years.