मूषक चातुर्य कथा

पुनश्च    मनोहर दातार    2018-09-29 08:30:27   

उंदीर आणि आपण एकाच घरात नांदत असतो. आपली इच्छा असो वा नसो. गणेशोत्सवाचे दहा दिवस केवळ तो निर्धास्त असतो, एरवी आपण त्याला घरातून हाकलण्याचे सर्वतोपरी उपाय करत असतो. परंतु खुद्द बुद्धिदात्याच्या सहवासात राहून त्याची बुद्धी घासून पुसून लख्ख झाालेली असते. प्राणीविश्वाचे अभ्यासक मनोहर दातार यांनी या लेखात उंदराच्या बुद्धीकौशल्याचे अनेक मनोरजंक दाखले अतिशय प्रवाही भाषेत दिलेले आहेत. सृष्टीज्ञान या मासिकाच्या नोव्हेंबर १९७५च्या अंकातून हा लेख घेतलेला आहे. सृष्टीज्ञान हे गेली ९० वर्षे अविरत सुरु असलेले मराठीतले एकमेव विज्ञानविषयक मासिक.  प्रा. गोपाळ  परांजपे, डॉ. वि. ना. भाजेकर, प्रा. प्र. रा. आवटी, प्रा. दिनकर धोंडो कर्वे , स. बा. हुदलीकर, प्रा. श्री. ल. आजरेकर आणि शं. ब. सहसबुद्धे यांनी ते  एप्रिल, १९२८ मध्ये पुण्यात सुरु केले.    ********** ‘श्रीगजाननाने आपले वाहन म्हणून मूषकाची केलेली निवड मान्य करण्यापूर्वी तू मला थोडी बुद्धी दे अशी अट मूषकाने घातली असावी आणि गजाननाने मूषकाच्या या साध्या अटीला तात्काळ मान्यता दिलेली दिसते. एरवी मूषकाच्या या छोट्या मूर्तीने, स्वत:ला धोरणी, कावेबाज व बुद्धिमान समजणाऱ्या माणसाचा सहज पराभव कसा केला असता?’ मूषकाला शत्रू अनेक. मांजर, साप, बेडूक, कावळा, घुबड, पिंगळा, मुंगूस, कोल्हा, गरुड असे एक ना दोन असंख्य शत्रू मूषकाला आहेत. या शत्रूच्या तडाख्यातून मूषक सुटलाच, तर माणूस त्याचा सारखा संहार करीत असतो आणि माणसाच्या तावडीतून तो सुटलाच, तर स्वत: मूषकच मूषकाला खाण्यास कमी करीत नाही. शत्रूंची ही लांबचलांब मालिका पाहिल्यावर वाटते की हा मूषकबाबा नष्ट कसा होत नाही! पण मूषक नुसता जगत नाही तर असंख्य प्राण्यांना ठार करून त्यांच्या छातीवर पाय रोवून

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


माहिती , सृष्टीज्ञान , मनोहर दातार

प्रतिक्रिया

  1. Chandrakant Chandratre

      4 वर्षांपूर्वी

    रंजक व अनोळखी माहिती.

  2. Sadhana Anand

      4 वर्षांपूर्वी

    उंदीर इतका बुध्दिमान असेल अस कधी वाटल नव्हत.

  3. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    खूपच मनोरंजक ! आमच्या चौथीच्या पुस्तकात उंदराच्या चातूर्याचा धडा आहे : भज्याचा प्रसंग वाचल्यावर मला तो आठवला . छान माहिती मिळाली .

  4. Priyanka Borphale

      4 वर्षांपूर्वी

    नवलच!मनोरंजक माहिती

  5. pgambekar16@

      6 वर्षांपूर्वी

    उंदीरांबद्दल छान माहिती

  6. asmitaph

      6 वर्षांपूर्वी

    Superb informative article .

  7. sureshjohari

      6 वर्षांपूर्वी

    खूपच छान माहीती आवडली

  8. RJDHAPTE

      6 वर्षांपूर्वी

    Very interesting..

  9. sugandhadeodhar

      6 वर्षांपूर्वी

    उंदीर धान्य साठा करतात हे माहीत नव्हते आकारावरून परीक्षा करु नये

  10. manjiriv

      6 वर्षांपूर्वी

    मूषक पुराण भारीच. लेख आवडला.

  11. ssaptarshi

      6 वर्षांपूर्वी

    मनोरंजक माहिती! आता कळले Ratatouille हा सिनेमा फ्रेंच पार्श्वभूमीवर का बनला आहे !

  12. sandeepkamble

      6 वर्षांपूर्वी

    उंदरांबद्दल नवीन माहिती मिळाली.

  13. vaishalichavan

      6 वर्षांपूर्वी

    फारच छान..

  14. drvyankatesh

      6 वर्षांपूर्वी

    खूपच छान माहीती उंदीर धान्याचे गोदामे नष्ट करतात हे वाचल होत आपण जितके उन्दिराला मारण्याचे प्रयत्न करू तेवढे ते हुशार होणार होतात विषारी औषध घालून भजे घरात ठेवल्यास एकदा जातील पन्हा तोन्डही एक वणार नाहीत पिन्जरा ठेवा चुकून एकदा अडकली पुन्हा फिरकतही नाही असो हे मूषक प्राण आवडल

  15. monginis

      6 वर्षांपूर्वी

    ekdum bhari ani khari vastusthiti

  16. swatisandaw

      6 वर्षांपूर्वी

    खूप मजेशीर माहिती.

  17. rajashreejoshi

      6 वर्षांपूर्वी

    उंदराबद्दल फारच आश्चर्यकारक आणि रंजक माहिती आहे ही

  18. bookworm

      6 वर्षांपूर्वी

    उंदीर एवढा बुद्धिमान असतो हे माहिती नव्हतं! मला हा प्राणी अजिबात आवडत नाही. हां....मांजर मात्र आता उंदराला मारत नाही.हे बदल उत्क्रांतीमुळे होत आहेत काय? असे आश्चर्यकारक बदल आणखी कुठल्या प्राण्यांत झाले आहेत का? वाचायला आवडेल!

  19. Aashokain

      6 वर्षांपूर्वी

    मूषकाच्या बुद्धीचातुर्याला प्रणाम! खरोखरच माहितीपूर्ण लेख!



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts