अंक- सह्याद्री; वर्ष- १९६८
सोनोपंत दांडेकरांच्या वैकुंठवासाचे वृत्त कानी पडताच माझ्या मनात उद्गार उमटले- ‘एक अलांछन चंद्रमा मावळला!’ - ‘चंद्रमे जे अलांछन - मार्तंड जे तापहीन’ या ज्ञानेश्वरांच्या पंक्ती माझ्या मनाला नेहमीच विलक्षण आनंद देतात. ज्ञानदेवांच्या कल्पनेतला असा एखादा तापहीन मार्तंड किंवा अलांछन चंद्रमा - प्रत्यक्षात असू शकेल - अशा दृष्टीने कधी विचारच केला नव्हता. पण तसा एक ‘अलांछन चंद्रमा’ - ‘शशांकाचे शीतळ तेज’ धारण करणारा एक सत्त्वपुरुष आपल्यात होता, याची जाणीव कै. दांडेकरांच्या मृत्यूची वार्ता ऐकताच माझ्या मनाने आवेगाने काढलेल्या उद्गारांनी करून दिली. आणि मग त्यांच्या चरित्राकडे पाहू लागल्यावर खरोखरच पटले की, कै. सोनोपंत दांडेकर हे आपल्यातले एक चालतेबोलते अलांछन चंद्रमा होते. कै. य. गो. जोशी यांनी - मागे सोनोपंतांच्यावर एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी कै. मामांना 'सोन्याचा पिंपळ' - म्हणून गौरविले होते. या सुवर्ण-पिंपळाच्या कांतीमान छायेत विसावण्याचे किंचित भाग्य माझ्या वाट्याला आले होते. दांडेकरांना प्राध्यापक म्हणून मी ओळखत नव्हतो आणि आज अध्यात्माकडे मी ओढला गेलो आहे तस बारा-पंधरा वर्षांपूर्वी नव्हतो. त्यामुळे - त्या दृष्टीनेही मी त्यांचा भक्त नव्हतो. १९५२ साली ‘वहिनीच्या बांगड्या’ चित्रपटाच्या लेखनाच्या निमित्ताने माझा मुक्काम दिवसातले व कधी कधी रात्रीचे देखील अधिकात अधिक तास य. गो. जोशी यांच्याकडे असे. सोनोपंतांना मी जवळून पाहिले ते जोशीबोवांकडेच. त्यावेळी सोनोपंतांनी संपादन केलेल्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या आवृत्तीची तयारी जोरात चालू होती. सोनोपंत बहुधा रोज तेथे येत. त्यांचे बसणे, चालणे, बोलणे मी लक्षपूर्वक व आदराने पाहत असे. जोशीबोवांक
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Geetanjali Joshi
4 वर्षांपूर्वीफार सुंदर लेख आहे
patankarsushama
7 वर्षांपूर्वीखूप छान माहितीपूर्ण लेख आहे
avthite
7 वर्षांपूर्वीलेख खूप छान आहे. कुठेही अती रंजकता न आणताही यथार्थ केलेले व्यक्तिचित्रण नक्कीच मनाला भावले.. खरेतर सात्विकता स्पर्शली असेच वाटले जणू..?
sharad1151
7 वर्षांपूर्वीलेख खुपच छान वाटला. बरेचदाआपला जिवलग माणुस गेल्याक्षणीचआपलं मन सुन्न होते आपण अवाक् होतो. लेखकाचे याबाबतआपले मनोगत छान शब्दात व्यक्त केलेआहे.
shubhadabodas
7 वर्षांपूर्वीशांताराम आठवले ह्यांनी सोनोपंत दांडेकरांचे यथार्थ चित्र रेखाटले आहे. माझ्या वडिलांकडून मी त्यांच्याबद्दल खूप ऐकले आहे. पुढील पिढीतील ते एक मोठे संतपुरुष होते.