कुंकवाची उठाठेव

पुनश्च    इरावती कर्वे    2018-08-20 19:00:21   

अंक- छंद ; वर्ष- नोव्हेंबर/डिसेंबर १९५४ 

एमार मठाच्या प्रशस्त वाचनालयात मी सकाळपासून मापे घेत होते. खाली जगन्नाथ मंदिराच्या प्रचंड पटांगणात माणसांची सारखी ये-जा चाललेली होती, सकाळ, संध्याकाळ, रात्र - केव्हाही पहा, चौकात माणसे नाहीत असे होत नाही. सगळ्या प्रांतांचे यात्रेकरू दिसत होते. तरी मी ऐन यात्रेच्या दिवसात गेले नव्हते. जसा दिवसाच्या चोवीस तासात एकही तास सुना जात नाही तसा वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसात एकही दिवस इथे यात्रेकरू नाही असे होत नाही. माझ्या मनात आले की मी एक वर्षभर पुरीला राहिले आणि मला रक्त दिल्याशिवाय यात्रा सफल होणार नाही अशी कोणी यात्रेकरूंची समजूत करून दिली, तर सर्व भारताच्या रक्ताचा नमुना मला विनासायास मिळेल! खालच्या पटांगणातील सर्वच नाही पण काही काही मंडळी वर येऊन मला मापे देऊन चालली होती. त्यांना वर घेऊन यायचे काम पुरीतीलच काही विद्वान मित्र निष्काम बुद्धीने करीत होते. ‘‘हे गृहस्थ श्री........ प्रसाद. येथील सामन्तकरण.’’ मला मदत करणार्‍या शास्त्रीबोवांनी सांगितले. ‘‘सामन्तकरण नाही, सम्राटकरण सर्व करणांचे मुख्य,’’ त्या गृहस्थांनी शास्त्रीबोवांची चूक सुधारली. ‘‘सट की संभ्रान्त?’’ असे पुटपुटत शास्त्रीजी खाली गेले व मी त्या गृहस्थाची मापे घेऊ लागले. त्या गृहस्थाची मापे झाल्यावर दुसरा काही उद्योग नसल्याने ते तेथेच बसले व मी काय करते हे पहात पहात मला त्यांनी आपल्या कुळाची हकीगत सांगितली व माझ्या कामाबद्दल माहिती विचारली. करण म्हणजे कायस्थ. पुरीच्या देवालयाचे पुजारी जसे निरनिराळे हुद्देवाले तसेच जमाखर्च पहाणारेही निरनिराळ्या हुद्याचे. रोजचा खर्च लिहिणार्‍या कारकुनापासून तर सर्व संस्थानाचा हिशेब पहाणारे करणांचे सम्राट अशी निरनिराळी घराणी होती.

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इरावती कर्वे , छंद , मुक्तस्त्रोत
ललित

प्रतिक्रिया

  1. Mukund Deshpande

      4 वर्षांपूर्वी

    छान लेख

  2. Prakash Ghatpande

      4 वर्षांपूर्वी

    साताऱ्यात १९९५ साली झालेल्या ज्योतिष अधिवेशनात त्यावेळचे संमेलनाध्यक्ष ज्योतिषी कृष्णराव वाईकर यांनी ज्योतिषाला धर्मशास्त्राचा अपरिहार्य भाग मानले होते. ज्योतिषाला विरोध करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला वठणीवर आणण्यासाठी त्या आधारे शिवसेना, विहिंप सारख्या संघटनांना हाताशी धरुन 'कुंकवाची उठाठेव` केली होती. ( संदर्भ म.टा अग्रलेख ३१-१०-९५ ) त्याची आठवण लेख वाचताना झाली.

  3. Ashwini Gore

      4 वर्षांपूर्वी

    इतक्या महान लेखिकेचे लेख वाचायला छान वाटते पण लेख का कोण जाणे अर्धवट वाटला .

  4. Janhavi

      7 वर्षांपूर्वी

    काही लेख हे काळानुसार त्याचा रुबाब राखून असतात. त्यातीलच हा एक. १९५४ मधील लिखाण आजही वाचताना नवीन वाटते

  5. bharatik64

      7 वर्षांपूर्वी

    छान वाटला माझ्या सारखी फक्त एक वाचक स्त्री त्या थोर लेखिकेच्या लिखाणावर काय अभिप्राय देणार

  6. kamalakar keshav panchal

      7 वर्षांपूर्वी

    बऱ्याच वर्षांनी इरावतीबाई कर्वे यांचा लेख वाचायला मिळाला. सुंदर व माहितीपूर्ण लेख असून त्यांच्या लिखाणात संस्कृती व वैचारिक ज्ञानाचा अमोल ठेवा आढळून येतो. भोवरा, युगान्त, भारतीय संस्कृती या सारख्या त्यांच्या ग्रंथांमधून याची प्रचिती येते, म्हणूनंच त्यांचे लेख वाचणे म्हणजे एक अवर्णनीय आनंदाचा सोहळा असतो. धन्यवाद हा आनंद अनुभवता आला.

  7. ppdigital

      7 वर्षांपूर्वी

    शेवट मिश्किल ..आताची टिकली , नाते टिकवायला समर्थ का नाही याचे उत्तर ममळते का असा नविन प्रश्न मनात येतो ..:-)

  8. shriramclinic

      7 वर्षांपूर्वी

    लेख मिश्कील आहे तरी त्या कथेचा गाभा विचार करण्याजोगा आहे

  9. Meenal Ogale

      7 वर्षांपूर्वी

    मला इरावतीबाईंचे लेखन पूर्वीपासूनच खूप आवडते.पुरातत्वशास्त्रासारख्या गंभीर आणि कांहीशा क्लिष्ट विषयात काम करीत असून सुद्धा त्यांची म्हणून खास मिश्किल कांहीशी खोचक शैली आहे.एखादा छोटासा प्रसंग ज्या पद्धतीने त्या रंगवतात त्यामुळे वाचताना मजा वाटते.एखादा दुर्गा भागवतानाच पण लेख वाचायला आवडेल.

  10. Rajrashmi

      7 वर्षांपूर्वी

    खरच महत्वाचे आहे, फार मोलाची माहिती आहे, आता नवरा मेला तरी त्याच्या नावाने घातलेले अलंकार प्रेताकडेही उतरवत नाहीत, त्यांना त्याच महत्त्व माहित नसते



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts