इटालियन न्यू वेव्ह सिनेमानंतर जागतिक सिनेमात दखल घ्यावी असा क्रांतिकारी बदल घडून आल्याचे दिसले ते इराणी सिनेमात. 1979 साली झालेल्या इराणी क्रांतीनंतर कलावंत, दिग्दर्शक,लेखक यांच्यावर अनेक बंधने घातली गेली. या मुस्कटदाबीतून उलट इराणी सिनेमा झळाळून उठला. माजिद माजिदी, मोहसिन मखमलबाफ, अब्बास किरोस्तामी, जााफर पनाही असे अनेक श्रेष्ठ आणि बरेच नवे दिग्दर्शक उदयाला आले. त्यानंतर आलेल्या नव्या दिग्दर्शकांत तरूणींची संख्या मोठी आहे हे विशेष. हेमंत जोगळेकर यांच्या प्रस्तुत लेखातही मर्झी मेस्किनी या दिग्दर्शिकेच्या 'साग-हये वेलगार्द' (स्ट्रे डॉग) या चित्रपटाचे मनोवेधक रसग्रहण आहे. अफगाणिस्तानातील सामाजिक, राजकीय स्थितीचा कुटुंबांवर झालेला परिणाम या कथेतून सांगितलेला आहे. लहान मुलांच्या व्यक्तिरेखा आणि त्यांचा सहज सुंदर अभिनय हा अलिकडल्या इराणी चित्रपटांचा विशेष यातही दिसून येतो. लेख वाचून झाल्यावर हा चित्रपट पाहण्याची इच्छा नक्कीच होईल. यू ट्यूबवर Sag-haye velgard असे टाइप केले की हा पूर्ण चित्रपट पहायला मिळेल. योगायोगाने श्रेष्ठ जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसवा यांचाही stray Dog या नावाचा एक चित्रपट आहे आणि तोही अप्रतिम आहे. जिज्ञासूंनी तोही अवश्य पहावा- ********** लेखक- हेमंत जोगळेकर गेली काही वर्षे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत, इराणकडून सातत्याने चांगले चित्रपट सादर केले जात आहेत. एका वेगळ्याच संवेदनशीलतेचा प्रत्यय या चित्रपटांतून येतो. मर्झी मेस्किनी या तरुण दिग्दर्शिकेचा भटकी कुत्री (साग-हये वेलगार्द) हा चित्रपट मी गतवर्षी दिल्लीत भरलेल्या ओशियानच्या सिनेफॅन या आशियाई चित्रपट महोत्सवात पाहिला. स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
bhidelata
7 वर्षांपूर्वीI have always enjoyed Irani films. Will see this as well on you tube
Namratadholekadu
7 वर्षांपूर्वीवा, खूपच छान चित्रपट परीक्षण आहे. अशी आणखी उत्तमोत्तम परीक्षणे वाचावयास आम्हाला आवडतील.
Namratadholekadu
7 वर्षांपूर्वीचित्रपट परीक्षण वाचून हा चित्रपट पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. अशा प्रकारच्या आणखी लेखांची अपेक्षा आहे....?
bookworm
7 वर्षांपूर्वीअशी आणखी परीक्षणे वाचायला आवडतील!
TINGDU
7 वर्षांपूर्वीकथानक आवडले. चित्रपटाच्या दिग्दर्शकीचे कौतुक ही वाटले.
mugdhabhide
7 वर्षांपूर्वीअसे चित्रपट परिक्षण वाचणे हा देखील एक छान अनुभव आहे
gadiyarabhay
7 वर्षांपूर्वीएका वेगळ्या चित्रपटाची ओळख. असे सिनेमे कधी आणि कुठे दाखवले जातात
Nishikant
7 वर्षांपूर्वीसरस!