अंक : वसंत,१९८०लेखाबद्दल थोडेसे : विदर्भातील ज्या नेत्यांना राज्यव्यापी मान्यता मिळाली त्यात लोकनायक बापूजी अणे हे प्रमुख नाव. सामाजिक, राजकीय, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक वर्तुळातील ते अधिकारी व्यक्ती होते. अणे यांचा जन्म २९ ऑगस्ट १८८० रोजी झाला. नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून १९०२ साली ते बी. ए. झाले. त्यानंतर कलकत्ता विद्यापीठातून ते एल. एलबी झाले. लोकमान्य टिळकांना आपले गुरु मानून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतरच त्यांना ‘विदर्भाचे लोकनायक’ या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे काँग्रेसमध्ये त्यांचे मतभेद झाले.इंग्रज राजवटीत व्हॉईसरॉयच्या सल्लागार मंडळाचे सल्लागार, सिलोनमध्ये भारताचे हायकमिशनर आणि पुढे स्वतंत्र भारतात बिहारचे राज्यपाल अशी पदे त्यांनी भूषविली. प्राच्यवाङ्मयाचा त्यांचा व्यासंग होता. तत्त्वज्ञान, इतिहास, धर्म आणि साहित्य हे त्यांचे चिंतनाचे विषय होते. टिळकांच्या जीवनावर आधारित त्रिखंडात्मक श्लोकबद्ध संस्कृत काव्य त्यांनी रचले. १९२८ साली ग्वाल्हेर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. २६ जानेवारी १९६८ साली त्यांचे निधन झाले.१९८० साली अणे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'वसंत' मध्ये आलेला हा वीणा बाळशास्त्री हरदास याचा लेख. ते लोकनायक म्हणून कसे होते आणि मायाळू आप्त म्हणून कसे होते या दोन्हीचे मनोज्ञ दर्शन या लेखातून घडते-लोकनायक बापूजी अणे यांच्या वयाला १९८०मध्ये शंभर वर्षे पूर्ण होतात म्हणून त्यांचा शताब्दी महोत्सव करायचे ठरले. त्या उत्सवातील अनेक योजनांत त्यांच्या आठवणींचा संग्रह प्रकाशित करायचं ठरलं. तश ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
milindraj09
7 वर्षांपूर्वीआणखी काही आठवणी असतील तर वाचायला आवडतील
deepa_ajay
7 वर्षांपूर्वीस्वर्गीय बापूजी अणे हयाच्या बद्दल पहिल्यांदाच वाचले, बाळशास्त्री हरदास हे नाव आधी पासूनच माहीत होते, पुनश्च चे मनपुर्वक आभार
ulhas
7 वर्षांपूर्वीविणाताईंची शैली भावली. किती निरागस पणा आहे निवेदनात!
Aashokain
7 वर्षांपूर्वीआजच्या दांभिक युगात अशी आपल्या मताना चिकटून राहणारी, त्याचा प्रसार प्रचार करणी व्यक्तिमत्वे जवळजवल नाहिशीच झाली आहेत. अशा नररत्नांची माहिती वाचायला मिळाली तरी मनात आशा धुगधुगत रहाते की या भरतभूमीला ललामभूत ठरणारी व्यक्तिमत्वे होती याची आठवण तरी होते आणि त्यापासून प्रेरणा घेऊन आजच्या परिस्थितीत कोणीतरी अणे ऊभा राहील! महाराष्ट्राला *महा-राष्ट्र* घडवणा-या व्यक्तिमत्वाचांंचे स्मरण झाले की मनात विचार येतो की ज्यानी *वरम् जनहितम् ध्येयम, केवला न जनस्तुति:* हे व्रत पाळण्यात आपले आयुष्य घालवले व त्यातही वैयक्तित संदर्भातील मार्दव राखून!अशी व्यक्तिमत्वे स्वर्गवासी झालीी ही खरोखरच पकमेश्वराची कृपा! अन्यथा केवळ स्वार्थात एहिक विचार करणा-या या युगातील व्यवहार पाहून त्यांच्या पदरी दु:खच पडले असते! महाराष्ट्रातील आजचे * वरम् स्वहितम् धेयम* हेच ब्रीद बाळगणा-या नेत्यांमुळे महाष्ट्राची मोठीच हानी झाली आहे.'महाराष्ट्र हा हिन्दुस्थानचा खडग़्हस्त झाला पाहिजे* हे स्वतंत्र्य वीरांचे स्पप्न केव्हाच इतिहासजमा झाले. लोकनायकांच्या स्मृतीला शतश: प्रणाम।