असे म्हणतात की वाचक बालसाहित्याकडून प्रौढ साहित्याकडे वळतो तेव्हा तो पहिल्यांदा प्रभावित होतो तो व.पु. काळे यांच्या साहित्याने. वपुंचे मराठी भावविश्वातील हे स्थान आजही अबाधित आहे,यात त्यांच्या लिखाणाची ताकद कळते. वपुंचे साहित्य म्हणजे तुमच्या आमच्या आयुष्यात घडणाऱ्या बोधकथाच जणू. अशीच ही कथाही आहे. कथा म्हणा किंवा ललितलेख म्हणा. या दोहोतील फरकरेषा तशीही अस्पष्टच असते. व.पु, २००१ साली गेले. त्यानंतरच्या १७ वर्षात त्यांच्या साहित्याचा खप कमी झालेला नाही आणि साध्या सोप्या भाषेत जगण्याचे तत्वज्ञान सांगणारा दुसरा लेखकही झालेला नाही. बासष्ट वर्षापूर्वी १९५६ साली 'प्रसाद' मासिकात आलेली वपुंची कथा वाचून याचाच प्रत्यय येतो. ********** अंक- प्रसाद -१९५६ माझ्या डोक्यात एकदम एक विचार आला की, धावत जाऊन त्या बूटपॉलिश करणाऱ्या मुलाला सांगावे की, ‘‘बाबा रे, ह्या ठिकाणी तू धंदा करावयाला बसू नकोस! ही जागा फार घातक आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी ह्या ठिकाणी एक म्हातारा....!’’ ‘‘.....भलताच नादिष्ट आहेस रे तू! त्या पॉलिशवाल्याकडे काय पहात राहिलास?’’ गोगटेने माझ्या पाठीवर थाप मारीत म्हटले. पण मी त्याच विचारात गुंग असल्यामुळे गोगटेला काहीच उत्तर दिले नाही. पुन्हा थोड्याशा चिडक्या आवाजात गोगटेने मला विचारले, ‘‘कसला विचार करतो आहेस?’’ मी संथपणे म्हणालो, ‘‘तसा काही महत्त्वाच्या गोष्टीवर नव्हतो विचार करीत! पण त्या बूटपॉलिशवाल्या पोराला त्याच जागी पाहून असे वाटू लागले की, त्याला जाऊन सांगावे की, ह्या जाग्यावर बसू नकोस! काही वर्षांपूर्वी या इथे एक म्हातारा बसायचा, पण रस्ता सोडून एक मोटार फूटपाथवर चढल्यामुळे तो मेला तेव्हा....’’ ‘‘तू पण या जाग्यावर ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
sidhayevarsha277@gmail.com
5 वर्षांपूर्वीव पु कायमच डोळ्यात पाणी आणतात!👍👍👌👌👌
sansal24
5 वर्षांपूर्वीआयुष्यात असे अनेक लोकं भेटत असतात काही गोड बोलून केसाने गळा कापतात तर काही आपल्या ताटातील अर्धे अन्न दुसरयला देतात माणुसकीचा झरा आटला नाही असे तेव्हा वाटून जाते व जगणं सुसह्य होऊन जाते
rsrajurkar
6 वर्षांपूर्वीKhup chann lekh . Dhanyawad .
parelkarmg
7 वर्षांपूर्वीही प्रतिक्रिया नाही अनुभव आहे. आमच्या कारखान्यात एक १८ वर्षा चा मुलगा होता. गरीब व वडील आजारी. कारखान्यात झोपे. पुढे त्याचे लग्न झाले त्याचा पगार होता ८०० रुपये. वडिलांनी त्याला दिले ३५०००. इतर कोणाला माहित नव्हते. वडील वारल्यावर तो ती डायरी घेऊन आला. बाकी होते ३२०००. तो नोकरीला दुसरीकडे गेला पण दर महिन्याला ५०० प्रमाणे ७ वर्षात सर्व पैसे फेडले. माझे मत असे आहे की पैसे यायला लागले कि माणुसकी, सच्चा इ वगैरे विसरली जाते.
किरण भिडे
7 वर्षांपूर्वीमिलिंद जी, आम्ही ती प्रसाद मासिकाच्या अंकात वाचली म्हणून त्याचा संदर्भ दिला आहे. इमेजच आपली आपण त्या अंकाच्या मुखपृष्ठाची ठेवली आहे.
manisha.kale
7 वर्षांपूर्वीकोणतेही काम प्राप्रामाणिकपणे करणे महत्वाचे. त्याच्या दर्जावरून माणसांना judge करू नये हे अत्यंत सहज भावपुर्ण शब्दात व्यक्त केले आहे.फार छान लेख. जीवनात फार मोठे तत्व सांगणारा भावस्पर्शी लेख. अप्रतिम.
sugandhadeodhar
7 वर्षांपूर्वीजगात चांगली माणसे ही आहेत म्हणून विश्वास जिवंत आहे या गोष्टी वर विश्वास बसतो.
Potdar100
7 वर्षांपूर्वीसाध्यासुध्या शब्दातून व प्रसंगातून उच्च तत्वज्ञान सांगणं हे वपूंचं कौशल्य इथही दिसतय .. Hatta off ...
SachinBhoir
7 वर्षांपूर्वीजीवनाचे तत्वज्ञान वपुंशिवाय आणखी दुसरा कुठला लेखक समजवु शकतो? सहज सोप्या शब्दांत कथेचा एक एक धागा जसा उलगडत जातो तसतसे काहीतरी नविन गवसल्याचा आनंद मिळत जातो.
bookworm
7 वर्षांपूर्वीवाॅव...मस्त...फारच छान!
purnanand
7 वर्षांपूर्वीव.पु. लेखनशैलीचा पूर्ण ठसा उमटलाय.खूप हृदयस्पर्शी कथा. छान.
milindKolatkar
7 वर्षांपूर्वीआत्ता कुठे मिळेल? : मायाबाजार, १९७७, मेहता प्रकाशन, पुणे. १३०/-, कथासंग्रह, पाने: vi + १३२. या कथेचे पृ.: ११६-१२०. शक्य झाल्यास देत जा संपादक साहेब!
akashvthele
7 वर्षांपूर्वीलेखा अगोदरची वाक्ये खरी आहेत. लहानपणी बाल साहित्य वाचता-वाचता वपु कधी हातात आले आणि प्रौढ करून गेले हे सांगता येत नाही आणि अजूनही ती धुंदी गेलेली नाही. आता डिजिटल युगात आणि डिजिटल रुपात वपु वाचतोय तरीही त्यांच्याशी आपण सहजपणे 'रिलेट' होऊ शकतो.
sureshjohari
7 वर्षांपूर्वीएक सुंदर आणि भावपूर्ण हृदयाला भिडणारा लेख . आवडला . धन्यवाद
arya
7 वर्षांपूर्वीटचिंग !दीडदमडीची समजली जाणारी माणसेच लाख मोलाची असतात. अन लाख मोलाची वाटणारी निघतात दीडदमडीची!
shubhada.bapat
7 वर्षांपूर्वीव पु खासियत
padmakarhade
7 वर्षांपूर्वीखूप भावपूर्ण लेख.
Aashokain
7 वर्षांपूर्वीवपू. एक उमदा तत्वज्ञ! साध्या सोप्या भाषेत जीवनाचे सार सांगणारा माणूस. त्यांची 'तारतम्य' कथा तर रोजच आठवणारी! अनेकानेेेक ललना त्यांच्या घरात येतात. सकाळपासून रात्री निजेपर्यंत! दातांची निगाा ते रात्रीच्या बिछान्यावर घालायच्या चादरीपर्यंतच्या सर्व उपयोगी वस्तू जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे खपवायचाा प्ररयत्न करतात. शेवटी वपू एक षट्कार मारतात! जाहिरातीवाले जाहिरात करणारच. आपण वापरायचे ते तारतम्य! इतकी वर्षे झाली पण त्याचे ते "तारतम्य" काही मनातून जात नाही! एवढेच नाही, ते मनात एवढे रूतून बसलय की माझ्या रोजच्या जीवनाशी ते निगडीत झाले आहे. काहीही करताना मग ती खरेदी असो की सेवा असो किंवा दुस-या कोणत्याही व्यक्तिशी व्यवहार असो. "तारतम्य" मनाचा तोल ढळू देत नाही! धन्यवाद वपू!!
Rohan
7 वर्षांपूर्वीछान
ajaygodbole
7 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख!!!
Sukruta
7 वर्षांपूर्वीमाणसाचं मोल सहजपणे सांगणे ही व. पु. काळे यांची खासियतच आहे. हृदयाला स्पर्श करणारा लेख!