अंक- अंतर्नाद; वर्ष- सप्टेंबर २०१० असमाधान हा सध्याच्या संस्कृतीचा आत्मा आहे. हे असमाधान आपल्या शरीरापासून ते आपला नवरा, बायको, मुले, काम, मिळणारे पैसे, घर, वाहन ह्या सर्व गोष्टींत परमेश्र्वरावर ताण करून सर्वव्यापी झालेले आहे. ‘ठेविलें अनंते तैसेंचि राहावें, चित्तीं असो ध्यावें समाधान’ म्हणणारे तुकोबा म्हणजे अडाणीच वाटतील, अशी परिस्थिती आहे. एकदा ‘चित्तीं असो द्यावे असमाधान’ अशी परिस्थिती उत्पन्न झाली, की मग ते मायावी समाधान मिळवण्यासाठी मनुष्ये पैसे खर्च करू लागतात. समाधान हे पैशाने कधीच मिळत नसल्याने पैसे खर्च करतच बसतात. क्षितिजासारखे समाधान सारखे लांबच पळत असते. मनुष्यप्राण्याचे शरीर सामान्यपणे तीन प्रकारचे असते. एक म्हणजे उंच किडकिडीत असे, दुसरे गोल गरगरीत असे आणि तिसरे म्हणजे आटोपशीर आणि प्रमाणबद्ध असे. आपल्याला जे शरीर मिळते ते आपल्या आईवडिलांच्या गुणसूत्रांवर अवलंबून असते. शरीराच्या मुख्य ढाच्यात आपल्याला फार मोठे बदल कधीच करता येत नाहीत. शस्त्रक्रियेने काही बदल जरूर करता येतात, पण हे बदल ज्याच्या शरीरात काही जन्मजात दोष असतात अशांसाठीच उपयुक्त असतात. ह्या शस्त्रक्रिया सरसकट सर्वांसाठी उपयोगी नसतात. शरीराच्या तीन प्रकारच्या ठेवणी लक्षात घेतल्या तर आपल्या असे लक्षात येईल, की समाजातील साधारण तीस टक्के लोक हे बारीक असणार आणि दिसणार, तीस टक्के लोक हे जाड असणार आणि दिसणार आणि साधारण तीस टक्के लोक हे निसर्गतः आटोपशीर असणार आणि दिसणार. अर्थात एकंदर आळशीपणा जसा वाढत जाईल, तसे जाड लोक जास्त दिसणार. ह्यानुसार कमीत कमी साठ टक्के लोक हे वजनात सामाजिक संकल्पनेनुसार कमी अगर जास्त असणार. मग त्यांना न्यूनगंड देण्याचे काम केले की झाले. साठ टक्के लोक ह ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Santyvins
6 वर्षांपूर्वी२०१९ मध्येहि हि मते कायम आहेत का ?
ashutoshk
7 वर्षांपूर्वीआपल्या प्रकृती नुसार आहारविहार असावा असे आयुर्वेदात ही सांगितले आहे. सरांनी सोप्या पद्धतीने विषय मांडला. छान.
arush
7 वर्षांपूर्वीएवढा बहुचर्चित चोथा झालेला विषय येथे मलातरी अपेक्षित नव्हता
shailesh71
7 वर्षांपूर्वीखूपच छानं ! अर्थपूर्ण !
Aaidada
7 वर्षांपूर्वीलेख चांगला आहे पण रात्री जेवू नये ह्याचा खुलासा व्हायला हवा की एकदाच जेवावे का रात्री उशिरा जेवू नये.
shriramclinic
7 वर्षांपूर्वीडॉ. शारंगपाणी सर हे अतिशय परखड लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. योग्य लेख
asmitaph
7 वर्षांपूर्वीलेख नेहमीप्रमाणेच खुसखुशीत व नर्मविनोदी. या लेखकाची सर्वच पुस्तके अशीच छान आहेत . धन्यवाद
mohan
7 वर्षांपूर्वीchhan
Aashokain
7 वर्षांपूर्वीडॉक्टर महाशयांनी हा लेख लिहिला सप्टेंबर २०१०! पण त्यावर विचार किती जणानी केला? ठेविले अनंते .... सारखी वचने वाचण्यासाठी नसून पाळण्यासाठी असतात, हे तर आम्ही केव्हांच विसरलो आहोत. पण आज १५ ऑक्टोबर २०१८ रोजी सुद्धा वजनदार किंवा वजनरहित होण्यासाठी शॉर्टकट शोधण्याचा हव्यास काही सुटत नाही. साध्या व्यायामाने, योगासनांनी आणि मुख्यत: 'रसने'वर ताबा ठेऊन जे काम होऊ शकते ते औषधांच्या साह्याने करणे म्हणजे आपणच आपल्या देहावर अत्याचार करण्यासारखे आहे. डॉक्टरांनी महत्वाचा मुद्दा मांडलाय, तो आहे व्यक्तिमत्वाचा! सिक्सपॅक्स किंवा स्लिमट्रिमच्या नादात स्वत:चे व्यक्तिमत्व कसे उठावदार होऊ शकेल, याचा विचार करायला कोणाकडे वेळही नाही, ही खरी शोकांतिका आहे! युग जाहिरातींचे आहे, पण नकाराधिकारही आपल्या हाती आहेच की, त्या जाहिरातींना न भुलण्याचा!
arya
7 वर्षांपूर्वीमार्गदर्शक व उपयुक्त माहिती दिली......
वैशाली गुणे
7 वर्षांपूर्वी???सर्वांनी आचरण करावे असा लेख!