युद्ध जिंकले ! तह हरले !!


भारताची फाळणी झाली त्या क्षणापासून दोन्ही देशांना त्या त्या देशातील जनतेचा अहं कुरुवाळायला एक तयार 'शेजारी शत्रू' मिळाला. १९४७ पासून सतत दोन्ही देशातील सत्ताधीश देशभक्तीचा अंगार फुलवण्यासाठी, युद्धाचे दंड ठोठावण्यासाठी एकमेकांचा उपयोग करून घेत आहेत. काँग्रेसनेही तेच केले आणि आता भाजपही तेच करत आहे. सत्तेवर येताच पंधरा दिवसांत पाकचे कंबरडे मोडण्याचा निर्धार व्यक्त करूनच आताचे सरकारही सत्तेवर आले होते. सामान्य माणसाची भूमिका,सत्ताधाऱ्यांचे राजकारण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध दबाव यांच्या या खेळी आपण गेली  सात- आठ दशके पाहात आहोत. प्रस्तुत लेख  माणूसचे संपादक श्री. ग. माजगावकर यांनी १९६५ साली लिहिला होता. परंतु त्यातील नावांचे तपशील वगळता तो तसाच्या तसा आजही लागू होतो- ********** अंक – माणूस – १५ जुलै १९६५ पृथ्वीराज चव्हाणने महंमद घोरीला पकडून सोडून दिल्यापासून थेट आजतागायत आपल्या राज्यकर्त्यांची औदार्याची घातक चटक काही कमी झालेली दिसत नाही. आपल्या शूर जवानांनी कच्छसीमेवर पाकिस्तानला चांगलेच पाणी पाजले. त्यांना थोडी अधिक सवड व अधिकार दिले गेले असते, तर आपला ज्यावर संपूर्ण हक्क आहे, असे राज्यकर्त्यांना वाटते, त्या सर्व मुलखातून पाकिस्तानला काढता पाय घ्यावा लागला असता आणि नंतर सीमाआखणीचे काम कटकटींवाचून भारताला पार पाडता आले असते. ‘आमचे नीतिधैर्य उत्तम आहे. शत्रूला खडे चारण्यास आम्ही उत्सुकच आहोत, पण दिल्लीतील राज्यकर्त्यांनी नेहमीसारखा आमचा अवसानघात करू नये म्हणजे मिळविली-’ अशा अर्थाचे उद्गार सैन्यातील काही अधिकाऱ्यांनी दिल्लीतील पत्रकार कच्छसीमा पाहणीसाठी गेले असता त्यांचेजवळ काढल्याचे वृत्तपत्रांत येऊन गेलेच आहे. सैन्य सज्ज आहे, राज्यक ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , माणूस , राजकारण

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts