बुद्धिबळाचा जन्म


अंक - नवल, जून १९५६ सर्व खेळांचा राजा म्हणजे बुद्धिबळाचा खेळ. जगांतील बहुतेक देशांत तो खेळला जातो, इतकी त्याला लोकप्रियता प्राप्त झालेली आहे. इतर खेळांपेक्षां या खेळाचें कांही वेगळेंच वैशिष्ट्य आहे. या खेळांतील यशापयश हें काहीं केवळ खेळाडूच्या नशीबावर अवलंबून असत नाही. अगदीं क्षुल्लक चूकहि येथें घोडचूक ठरते. प्रत्येक ‘चाल’ अत्यंत विचार करून करावी लागते. या ठिकाणीं बुद्धीची परीक्षाच असल्यामुळें या खेळाला ‘बुद्धिबळ’ असें नांव पडलेलें आहे. खेळाडूनें आपल्या बुद्धीचें असेल-नसेल ते बळ खर्च केल्याशिवाय या ठिकाणीं चालायचेंच नाही! दोन निरनिराळ्या देशांतील खेळाडू, आपापल्या देशांत आपापल्या घरी, पुढें पट ठेवून वायरलेसच्या आधारानें खेळूं शकतील, असा हा एकच आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा खेळ आहे. १८५१ पासून प्रतिवर्षीं या खेळाचे आंतरराष्ट्रीय सामने अगदीं नियमित चालू आहेत. यावरूनच हा खेळ किती महत्त्व पावलेले आहे याची सहज कल्पना येऊं शकेल. ज्यांना या खेळाची आवड आहे, असे दोन खेळाडू एकदां पट मांडून बसले कीं त्यांना तहान-भुकेचीही दखल रहात नाहीं. अशा या खेळाचें जन्मस्थान तरी कोणतें, हा मोठा वादाचा प्रश्न आहे. भारत, इराण, चीन व इजिप्त हे देश या खेळाचे जनक आपणच आहोंत असा दावा मांडतात. तथापि गेल्या दोन शतकांतील बहुतेक सर्व इतिहाससंशोधकांनीं या खेळाचें जन्मस्थान भारतांत आहे असा कौल दिलेला आहे. थॉमस हाइड् यांनीं १६९४ मध्ये ‘De LudisOrientalibus’ या आपल्या ग्रंथांत, हा खेळ भारताचा आहे असें सर्वप्रथम जाहीर केलें. पुढें सर विल्यम जॉन्स यांनी या विषयावर कांही संशोधनात्मक लेख लिहून ते ‘Asiatic Researches’ या नांवाच्या ग्रंथांत समाविष्ट केले. त्यांत ते म्हणतात, “हिंदुस्थान हेंच ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


नवल , ज्ञानरंजन , बालसाहित्य , क्रीडा

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts