माझा सायकल प्रवास

पुनश्च    सुमुख जोशी    2018-12-17 19:00:31   

डोक्यावर हेल्मेट, अंगात सायकल सूट, सायकलला लागलेला लुकलुकणारा दिवा आणि हातात हॅंड ग्लोव्ज अशी माणसे हल्ली सकाळी सकाळी आपल्याला दिसतात. हेच दृश्य एकदा मलाही दिसले आणि मग माझे त्याविषयाबद्दल कुतूहल वाढत गेले आणि मी ठरवले की आता ह्या विषयाचा अभ्यास सुरु करायचा. मग वेगवेगळ्या पोस्ट वाचल्या. अशी माणसे दिसली की त्याना थांबवून माहीती गोळा करायला सुरुवात केली, आणि सध्या उपलब्ध असलेल्या इंटरनेटच्या माध्यमातून माहीती गोळा करायला सुरुवात केली, पण ही मिळालेली माहीती विशेष मोठी नव्हती आणि त्यात फार काही दम नव्हता. मग असे ठरविले की आता आपण स्वत: सायकल घ्यायची आणि आपण पण सायकल चालवणे सुरु करायचे. तेव्हा खिशात ५०००/- रुपये  घेऊन मी एका सायकलच्या दुकानात प्रवेश केला आणि ३५००/-रुपयाची  पहीली सायकल घेउन आलो. त्यावेळी रोज सायकल चालवायची, जवळच्या जवळ जायला सायकल चालवत जायचे असेही ठरले आणि त्याप्रमाणे ते सुरुही झाले. २- ३ दिवस खूप उत्साह होता व नंतर ८-१५ दिवसात तो उत्साह मावळलाही. मग ऑफिसमधल्या एका मुलाला ती सायकल देऊन टाकली आणि पुन्हा आपल्याला काही सायकल चालवायला वेळ मिळणार नाही असे ठरवून हे प्रकरण इथेच बंद करुन टाकलं. [caption id="attachment_7219" align="alignright" width="300"] ordinary cycle[/caption] पण मनात कुठेतरी नैराश्य होत की ते लोक करु शकतात मग आपण का नाही? त्याना कामं नाहीत का? त्याना घर संसार नाही का? त्याना अडचणी नाही का? ते पण आपल्यासारखे सामान्य आहेत आणि त्यांनाही ह्या सगळ्या अडचणी आहेतच ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रवासवर्णन , अनुभव कथन , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts