अर्नाळकरी रहस्याचा असाही उलगडा...


इंग्रजी रहस्यकथा, भयकथा वाचून त्याला देशी आंगडं-टोपडं चढवण्याचा मोह भारतीय लेखकांना गेली अनेक दशके पडतो आहे. ताज्या दमाचे लेखक ह्रषिकेश गुप्ते सध्या अशाच काही आरोपांचा सामना करत आहेत. परंतु मराठीतले बहुप्रसवी रहस्यकथाकार बाबुराव अर्नाळकर यांनी आपल्या अशा प्रकारांची कबुली देताना कधी का कू केले नाही. अर्नाळकरांच्या निवडक कथांचे जाडजूड संकलन सतीश भावसार यांनी केले होते ते दोन वर्षांपूर्वी राजहंसने प्रकाशित केले. सतत साहित्य वर्तुळात वावरणारे रविप्रकाश कुलकर्णी यांना त्या निमित्तानं अर्नाळकरांचा  रहस्यरंजन या मासिकाचं रुपडं बदलण्यास कारणीभूत ठरलेला एक धमाल किस्सा कळला, तो काय होता हे वाचणं हासुध्दा तेवढाच रंजक अनुभव आहे- रहस्याचा उलगडा आणि आलेले नवे वळण ! (मूळ शीर्षक) मुखपृष्ठकार सतीश भावसार यांच्या मुलीचं – सानिकाचं दिनांक २१ नोव्हेंबर २०१७ रोजी लग्न झालं. आता हे सांगण्याच कारण वेगळंच आहे. सदर लग्नाला डोंबिवलीसारख्या ठिकाणी ‘मौज’च्या भागवतांपासून ते ‘राजहंस’च्या माजगावकर / बोरसे यांच्यापर्यंत तर ‘ग्रंथाली’च्या हिंगलासपूरकरांपासून ‘नवचैतन्य’च्या मराठे यांच्यापर्यंत झाडून सगळे प्रकाशक आवर्जुन उपस्थित होते! एरवी एवढी प्रकाशक मंडळी क्वचितच एके ठिकाणी दिसतात. म्हणून असेल, कुणीतरी म्हटलं देखील की, बहुधा भावसारांनी सांगितलं असावं, “त्या दिवशी या आणि तुमचं मुखपृष्ठ घेऊन जा...” अर्थात् मग सगळे कोंडाळं करून गप्पाटप्पा करू लागले. विषय निघाला भावसार यांनी संपादित केलेल्या निवडक बाबुराव अर्नाळकर बृहत् संग्रहाचा. तेव्हा राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर म्हणाले, “आमचा पण अंदाज चुकवलेला हा ग्रंथ आहे. ह्याची तीसरी आवृत्ती संपायच्या मार्गावर आहे. प्रत्येक पुस्त ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी नियतकालिक , अवांतर , साहित्य जगत

प्रतिक्रिया

  1. asiatic

      6 वर्षांपूर्वी

    मजेशीर माहिती. रहस्यरंजनच्या काकतकरांंपैकी आता कुणी ते अंक ठेवले आहेत का ?

  2. asmitaph

      6 वर्षांपूर्वी

    छानच लेख

  3. rakshedevendra

      6 वर्षांपूर्वी

    डोंबिवली पूर्वी तापाच्या विकारामुळे बदनाम होते. डोंबिवली राहणारे म्हणजे बुद्धिजिवी अशी जरी ओळख तरी ते लक्ष्मी ज्यांच्यावर रुसून बसली असे कनिष्ठ मध्यमवर्ग असा लोकोपवाद डोंबिवलीच्या माथी लागला होता. रहदारी, आरोग्यासाठी दुर्गम नि जीव मुठीत घेऊन जगणारा पापभिरू चाकरमानी अशी पण डोंबिवलीची ओळख, त्यामुळे गिरगाव, दादर, पुणे अशा सुखवस्तू अन प्रशस्थ ठिकाणाहून डोंबिवलीत यातायात करून लग्नाकरिता येणारी प्रकाशक मंडळी पाहता ‘डोंबिवली सारख्या ठिकाणी’ हा शब्दप्रयोग (फार मनास लावून न घेता) 'अन्योक्ती' या अलंकारास अनुसरून घ्यावी असे सुचवावेसे वाटते.

  4. किरण भिडे

      6 वर्षांपूर्वी

    :-) अहो लेखक स्वतःच डोंबिवलीचा आहे. आणि मीही...आणि आमचं डोंबिवलीवर खूप प्रेम आहे. अभिमानाने स्वतःला डोंबिवलीकर म्हणवतो आम्ही.

  5. Apjavkhedkar

      6 वर्षांपूर्वी

    लेखअत्यंत मजेशिरआहे.आपल्याकडेअशाआठवणि जतन करायचि पध्दत नाहि. हे व्हायला हवे.

  6. sanjay

      6 वर्षांपूर्वी

    लेखाच्या ४थ्या ओळीतील 'डोंबिवली सारख्या ठिकाणी' हा शब्दप्रयोग खटकला



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts