‘न्यूजवीक’ची अखेर आणि प्रदीप लोखंडे

पुनश्च    भानू काळे    2019-01-14 20:00:26   

अंक – अंतर्नाद – सप्टेंबर २०१३ मुंबईच्या गजानन थत्ते या एका वर्गणीदार-स्नेह्याने अगत्यपूर्वक पाठवलेला ‘न्यूजवीक’चा शेवटचा अंक मध्यंतरी वाचला. तशी अंकावरची तारीख आहे ३१ डिसेंबर २०१२; पण आज वाचू, उद्या वाचू करता करता बरेच दिवस गेले. गेली ऐंशी वर्षे चालू असलेल्या या मातब्बर अमेरिकन साप्ताहिकाचा कळसाध्याय शोभेल असाच हा अंक आहे. बदलत्या जगाचा आढावा घेत, घटनांचा अन्वयार्थ लावत अमेरिकन जनमत घडवण्यात न्यूजवीकने किती महत्त्वाचे योगदान दिले, याची साक्ष हा ८०-पानी, ११०-रुपये किंमतीचा अंक वाचताना पटते. या वाटचालीतले अनेक टप्पे अमेरिकेच्याच नव्हे तर एकूणच जगाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. फ्रँकलिन रुझवेल्ट व अडॉल्फ हिटलर यांचा उदय चितारणारा १९३३ सालातला पहिला अंक, अमेरिकन प्रकाशनविश्र्वातील बीटल्सवरची पहिली मुखपृष्ठकथा (Bugs About Beatles) देणारा १९६४ मधला अंक, The Negro in America : What Must Be Done हे सांगणारा १९६७ मधला अंक, स्त्रीमुक्तीच्या प्रणेत्या ग्लोरिया स्टाइनेम यांच्यावरचा The New Woman हा १९७१चा अंक, बिल क्लिन्टन आणि मोनिका लेविनस्कि यांच्यातील प्रेमप्रकरण प्रथम उघडकीस आणणारा Will America Forgive Him? हा १९९८ मधला अंक, वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतरचा Why They Hate Us हा फरीद झकेरिया यांचा गाजलेला निबंध असलेला २००१ मधला अंक – अशा अनेक पथस्थापक अंकांविषयीची माहिती या अलविदा अंकात आहे. कोक आणि पेप्सी या शीतपेयांमधील पारंपारिक स्पर्धेप्रमाणे टाइम आणि न्यूजवीक यांच्यातील स्पर्धेवरही अंकात रोचक लेख आहे. संपादकीय विभागात पाचशे कर्मचारी असतानाही एखाद्या विशिष्ट पत्रकाराचे नाव लेखाखाली न छापण्याचे व सांघिक स्वरूपातच श्रेयोल्लेख करण्याचे अनेक दशके राबवलेले धोरण ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , शिक्षण , संस्था परिचय , व्यक्ती विशेष , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. jspalnitkar

      6 वर्षांपूर्वी

    प्रदीप लोखंडे यांचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारा लेख बहुविध वर उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार!! समाजात सुरू असलेल्या (विशेषतः शिक्षण, भाषाव्यवहार या क्षेत्रांत) स्तुत्य उपक्रमांची अत्यंत प्रभावी पद्धतीने वाचकांना ओळख आणि माहिती करून देण्याचे भानू काळे ह्यांचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे...ह्याला 'कार्य' च म्हणले पाहिजे कारण पासून ते त्यांच्या पुस्तकांपर्यंत हे दिसून येते... लेखक, बहुविध सारखा मंच आणि वाचक ह्यांचं हे networking पण आश्वासक आणि आवश्यक आहे !!



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts