अंक- अंतर्नाद, जुलै २००९ लेखाबद्दल थोडेसे : चोरी-मारी, घुसखोरी,लबाडी, फसवणूक, खोटे बोलणे हे सगळे आपल्याला नकारात्मक वाटते ना? पण अशा गोष्टी करताना एखाद्या कलेचा साधक होण्याचा, उपासक होण्याचा किंवा रसिकत्वाची दांडगी हौस भागवण्याचा हेतू असेल तर? तर अनेकदा या गोष्टी माफ तर ठरतातच शिवाय त्यातून काहीतरी चांगले घडल्यावर हे कर्तृत्व आपल्या भूतकाळाचा एक अविस्मरणीय भागही वाटू लागतो. संगीतकार,वादक, संगीत समीक्षक अरविंद गजेंद्रगडकर यांनी एकेकाळी संगीत मैफली ऐकण्यासाठी केलेले हे उद्योग म्हणजे किश्श्यांची रंगलेली एक मैफलच आहे, तिचा आस्वाद जरूर घ्या. ********** खरा वाचक वाटेल ते करून वाचतच राहतो. वाटेल ते म्हणजे काय करावं याविषयी ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांनी काही मार्गदर्शक सूत्रंपण सांगितली आहेत. मूळच्या इंग्रजी भाषेतल्या त्या त्रिसूत्रीचा मतितार्थ एवढाच की,“तुम्हांला वाचायचं आहे ना? मग पुस्तक विकत घ्या, ते जमतं नसेल तर मग उसनं मागून घ्या, हेही जमत नसेल तर खुश्शाल चोरी करा, पण वाचत राहा.” ‘चोरी कधी करू नये’ अशी शिकवण देणाऱ्या आपल्या समाजाला हा चोरीचा संदेश रुचला कसा आणि पचला कसा याचं आश्चर्य वाटतं! कारण या संदेशानं कुणाच्या भावना दुखावल्या गेल्याचं किंवा त्याविरुद्ध कुणी आंदोलन केल्याचं आणि ते अपरिहार्यपणे हिंसक बनल्याचं उदाहरण माझ्यातरी ऐकिवात नाही. याला एक कारण असं असावं, की हा मूळचा संदेश इंग्रजीत होता आणि आमच्या लहानपणी असा समज होता, की जे छापून येतं ते बरोबरच असतं आणि त्यातून ते इंग्रजीत असेल तर मग विचारायलाच नको! एकूण काय, की काही बाबतीत चोरी करायला हरकत नाही, असा इंग्रजी संदेश माझ्या मनावर लहानपणीच कोरला गेला. आणखीही काही इं ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Vinayak Shembekar
4 वर्षांपूर्वीकाही वर्षांपूर्वी "अंतर्नाद"मासिकात वाचलेल्या आठवणी आज पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन गेल्या.
atmaram-jagdale
5 वर्षांपूर्वीMADHAVIMD
5 वर्षांपूर्वीखूप प्रांजळ लेखन, मजा आली.
rrajan
6 वर्षांपूर्वीवा, छान आठवणी
Apjavkhedkar
7 वर्षांपूर्वीलेख वाचनिय होता. वाचताना मजाआला.